अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारताला सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली आहे. या अभियाना अंतर्गत लष्करही (Indian Army) आत्मनिर्भर होत आहे. पूर्वी परदेशातून आयात केले जाणारे हेलिकॉप्टर (Helicopter), रडार (Radar), रणगाडे (Tanks) असे 108 प्रकारचे संरक्षणाचे साहित्य आता देशातील उद्योजकांच्या मदतीने तयार केले जात आहे. या साहित्याच्या दर्जाची कठोर चाचणी लष्कराच्या विविध विभागांकडून होत आहे. भारतीय बनावटीचे लष्करी साहित्य (Indian-made military equipment) हे जागतिक दर्जाचे आहे, असे प्रतिपादन लष्कराच्या वाहन गुणवत्ता नियंत्रणालयाचे कमांडंट ब्रिगेडिअर (Commandant Brigadier) बी. के. पोखरियाल यांनी केले. (World class military equipment in Indian Army)
लष्कराच्या अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहन गुणवत्ता नियंत्रणाल (CQAV) यामध्ये भारतील लष्कराच्या संरक्षक साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ब्रिगेडिअर पोखरियाल बोलत होते.
लष्कराने काही संरक्षक साहित्य खरेदीचे धोरण सार्वजनिक केले आहे. ही प्रक्रिया इंटरनेटवर (Internet) ही उपलब्ध आहे. या साहित्याची भारतातील उद्योजकांच्या मदतीने निर्मिती केली जात आहे. लष्कराचे DRDO विभाग या उद्योगांना साहित्य निर्मितीसाठी योग्य ती मदत करत आहे. या साहित्याची लष्कराच्या DGQA विभागाच्या देशभरातील 126 प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते. अहमदनगरला CQAV विभागात धातू आणि रबराची चाचणी केली जाते. या विभागाचे अधिकारी आणि संशोधक देशाच्या वेगवेगळ्या भौगोलिक भागात जाऊन या धातू आणि रबराची तपासणी करतात. संरक्षक साहित्याच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच लष्करात हे साहित्य दिले जाते. असे प्रतिपादन ब्रिगेडिअर बी. के. पोखरियाल यांनी केले.
आमदार जगताप म्हणाले की, भारतातील उद्योजकांना संरक्षक साहित्य निर्मितीमध्ये सहभागी होऊन देशासाठी योगदान देण्याची संधी लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेसाठी लष्करात येण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल
शहर आणि परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने हे प्रदर्शन पाहण्यासाठी CQAV मध्ये आणले होते. या प्रदर्शनात अर्जन, T - 90, असे विविध प्रकाराचे रणगाडे, अतिरिके हल्ल्यांपासून संरक्षणासाठी असलेले चिलखती वाहने, आगीच्या काळात वापरले जाणारे आग प्रतिबंधक ड्रेस, जैविक हल्ल्यातील ड्रेस, बॉम्ब शोध पथकाचे ड्रेस, आग प्रतिबंधक उपकरणे हाताळण्याची पद्धतींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या संरक्षक साहित्यासमवेत फोटो काढण्यास ही परवानगी असल्याने वाहनाजवळ उभे राहून फोटो काढले जात होते. त्यांच्या चेहऱ्यांवर कुतूहल स्पष्ट जाणवत होते.
याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, वाहन अुनसंशोधन आणि विकास संस्था (VRDE) चे सहसंचालक जी. आर. एम. राव आदी उपस्थित होते. विणा दिघे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.