fossil 
देश

Fossil Fuels: जागतिक तापमानवाढ रोखण्याचा प्रयत्नांना खो? 2030 पर्यंत 110 टक्के जीवाश्म इंधनात होणार वाढ

‘प्रॉडक्शन गॅप' हा अहवाल प्रकाशित झाला असून यामधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जग सध्या जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्याऐवजी सन 2030 पर्यंत 110 टक्के अधिक जीवाश्म इंधन तयार करण्याच्या मार्गावर आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. यातील डेटानुसार, सन 2030 पर्यंत तेल उत्पादनात 27 टक्के आणि वायू उत्पादनात 25 टक्के तर सन 2050 पर्यंत अनुक्रमे 29 टक्के आणि 41 टक्क्यांनी वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे. (World on track to produce 110 pc more fossil fuels by 2030 in breach of Paris Agreement)

कोळशाचं उत्पादन वाढणार

‘प्रॉडक्शन गॅप' या रिपोर्टची चौथी आवृत्ती बुधवारी प्रसिद्ध झाली. या अहवालात म्हटलं की, भारत, इंडोनेशिया आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील उत्पादनात नजीकच्या काळात वाढ होऊन सन 2020 ते सन 2030 दरम्यान वार्षिक जागतिक कोळसा उत्पादन 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

पॅरिस कराराला खो

151 देशांनी निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचं ध्येय साध्य करण्याचं वचन दिलं असूनही हे घडते आहे. सन 2015 मध्ये, देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली. या करारातील ठरावांमध्ये जागतिक तापमान हे औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंशांपर्यंत रोखायचं आहे. त्यासाठी सरासरी तापमानवाढ ही 2 अंशांपेक्षा कमी ठेवण्याचं वचन दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पण, नव्या आकडेवारीनुसार, जागतिक कोळसा, तेल आणि वायूंची या दशकात सर्वोच्च मागणी असेल. “सन 2030 मध्ये तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यापेक्षा सुमारे 110 टक्के अधिक जीवाश्म इंधनाचे उत्पादन करण्याची जगभरातील सरकारांची योजना आहे ही तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यापेक्षा 69 टक्के अधिक आहे,” अहवालात नमूद केले आहे. (Latest Marathi News)

उत्पादनातील तफावत वाढत जाणार

"इंधनाच्या उत्पादनातील तफावत कालांतरानं वाढत जाईल असा अंदाज आहे. सन 2050 पर्यंत, नियोजित जीवाश्म इंधनाचं उत्पादन अनुक्रमे 1.5 अंश सेल्सिअस किंवा 2 अंश सेल्सिअस तापमानवाढ मर्यादित पातळीपेक्षा 350 टक्के आणि 150 टक्के जास्त असेल," असंही हा अहवाल सांगतो.

स्टॉकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट (SEI), क्लायमेट अॅनालिटिक्स, E3G, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IISD) आणि UN Environment Program (UNEP) यांनी आणलेला 'द प्रोडक्शन गॅप रिपोर्ट' सरकारांच्या नियोजित आणि अनुमानित कोळसा, तेल आणि उत्पादनाचे मूल्यांकन करतो.

2050 पर्यंत कोळसा उत्पादन घटणार

जागतिक सरकारी योजना आणि अंदाजानुसार (GPP) सन 2020 पातळीच्या तुलनेत, वार्षिक तेल आणि वायू उत्पादन 2030 पर्यंत 27 टक्के आणि 25 टक्के आणि 2050 पर्यंत 29 टक्के आणि 41 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. 2020 आणि 2030 दरम्यान वार्षिक कोळसा उत्पादन 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. सन 2030 आणि सन 2050 दरम्यान 41 टक्क्यांनी घसरेल असं भाकीतही हा अहवाल करतो.

भारत वाढवणार कोळशाचं उत्पादन

दरम्यान, "भारत, इंडोनेशिया आणि रशियन फेडरेशन हे सर्व सन 2030 पर्यंत कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ करण्याची योजना आखत आहेत. रशियन फेडरेशनचे आशिया-पॅसिफिक आणि अटलांटिक प्रदेशांना कोळसा उत्पादन आणि निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

भारत याबाबत स्वावलंबी आहे आणि कोळसा उद्योग सध्या उत्पन्न आणि रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इंडोनेशिया आणि कझाकस्तानने उच्च मूल्यवर्धित कोळसा-आधारित उत्पादने विकसित करण्याच्या उद्देशाने कोळशाचे उत्पादन सुरू ठेवण्याची योजना आखली आहे,” असंही या अहवालात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT