World Population Day Esakal
देश

World Population Day: "१०० वर्षे की १०००" भारतात कधी हिंदूंपेक्षा जास्त होणार मुस्लिमांची संख्या? तज्ज्ञ काय सांगतात?

अंकिता खाणे (Ankita Khane)

World Population Day: जगातील इतर देशांमध्ये भारताची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षी, संयुक्त राष्ट्रांनी (UN) भारताच्या लोकसंख्येसंदर्भात एक आकडेवारी दिली होती. पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढेल आणि नंतर ती कमी होऊ लागेल. UN च्या मते, भारताची लोकसंख्या 142.57 कोटी आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हिंदू आणि नंतर मुस्लिम आहे.

मुस्लिम स्त्रिया हिंदू स्त्रियांपेक्षा जास्त मुले जन्माला घालतात, त्यामुळे भारतातील मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत हिंदूंना मागे टाकतील असा दावा अनेकदा केला गेला आहे. मात्र, तज्ञांच्या मते, हे अशक्य आहे. 100 वर्षात किंवा 1000 वर्षातही असं काही घडण्याची शक्यता नाही.

कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीचे माजी अध्यक्ष देवेंद्र कोठारी यांनी सांगितले की, पुढील जनगणनेपर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या एकतर कमी होईल किंवा स्थिर राहील, तर हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये किंचित वाढ दिसून येईल. त्यांचा असा अंदाज आहे की, 2170 पर्यंत म्हणजे 146 वर्षे जर फक्त मुस्लिमांनीच मुले जन्माला घातली आणि हिंदूंनी मुळीच मुले जन्माला घातली नाहीत तर मुस्लिमांची लोकसंख्या वाढेल असे नाही.ते म्हणाले की, इतके दिवस हिंदू मुले जन्माला घालत नाहीत, हे शक्य नाही, पण मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत असे दावे करण्यात काही अर्थ नाही.

पुढील जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या किती असेल?

शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर हिंदूंची लोकसंख्या 79.08 टक्के, मुस्लिम 14.23 टक्के, ख्रिश्चन 2.30 टक्के आणि शीख 1.72 टक्के होती. १३ वर्षांपूर्वी ९६.६२ कोटी हिंदू, १७.२२ कोटी मुस्लिम, २.७८ कोटी ख्रिश्चन आणि २.०८ कोटी शीख होते. याचा अर्थ हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये 79.40 कोटींचा फरक आहे. देवेंद्र कोठारी यांनी वैज्ञानिक विश्लेषणाचा दाखला देत सांगितले की, पुढील जनगणनेपर्यंत हिंदूंची लोकसंख्या ८०.३ टक्के होईल, तर मुस्लिम लोकसंख्या एकतर कमी होईल किंवा स्थिर राहील असा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

मुस्लिम हिंदूंना मागे टाकण्याची शक्यता किती आहे?

माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी त्यांच्या 'द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया' या पुस्तकात म्हटलं आहे की, भारतातील मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त असू शकत नाही. पुस्तकात दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिनेश सिंह आणि प्राध्यापक अजय कुमार यांच्या गणितीय मॉडेलच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते आणि त्यानुसार 2021 मध्ये जनगणना होणार होती, परंतु अनेक कारणांमुळे ती होऊ शकली नाही. ही मॉडेल्स २०२१ मध्येच सादर करण्यात आली आणि त्याच वर्षी एस. वाय. कुरेशी यांच्या पुस्तकात याचा समावेश होता.

बहुपदीय वाढ आणि घातांकीय वाढ म्हणजे काय?

बहुपदीय वाढ आणि घातांकीय वाढीद्वारे, हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या कधी समान होऊ शकते का याचा अंदाज लावला गेला. बहुपदीय वाढ मॉडेलनुसार, 1951 मध्ये 30.36 कोटी हिंदू होते आणि 2021 पर्यंत ते 115.9 कोटी होण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 1951 मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 3.58 कोटी होती, जी 2021 मध्ये 21.3 कोटी होईल असा अंदाज आहे.

घातांकीय मॉडेलमध्ये, हिंदू 120.6 कोटी आणि मुस्लिम 22.6 कोटी असल्याचा अंदाज आहे. कुरेशी यांनी पुस्तकात म्हटले आहे की, दोन्ही मॉडेल्स हे दर्शवत नाहीत की मुस्लिम लोकसंख्या कधीही वाढेल किंवा हिंदूंच्या बरोबरीने होईल. या मॉडेलवरून हे स्पष्ट होते की 1000 वर्षांतही मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होण्याची शक्यता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT