narendra modi file photo
देश

World Press Freedom index 2021: मोदींच्या नेतृत्वातील भारत पत्रकारांसाठी धोकादायक?

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य इंडेक्स 2021 (World Press Freedom Index 2021) ची यादी जाहीर झाली असून यात भारताची यावर्षी घसरण झालेली नाही. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स Reporters Without Borders (RSF) या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या पत्रकारितेसंबंधी संस्थेने हा रिपोर्ट जारी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य इंडेक्स 2021 (World Press Freedom Index 2021) ची यादी जाहीर झाली असून यात भारताची यावर्षी घसरण झालेली नाही. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स Reporters Without Borders (RSF) या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या पत्रकारितेसंबंधी संस्थेने हा रिपोर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली- जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य इंडेक्स 2021 (World Press Freedom Index 2021) ची यादी जाहीर झाली असून यात भारताची यावर्षी घसरण झालेली नाही. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स Reporters Without Borders (RSF) या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या पत्रकारितेसंबंधी संस्थेने हा रिपोर्ट जारी केला आहे. यादीमध्ये घसरण झाली नसली तरी भारताचा समावेश पत्रकारितेसाठी 'वाईट' असणाऱ्या देशांमध्ये झाला आहे. पत्रकारांना त्यांचे काम करु देण्यासाठी भारत हा धोकादायक देश असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

180 देशांच्या जारी झालेल्या या यादीमध्ये नॉर्वेने पुन्हा एकदा टॉप केले आहे. नॉर्वेनंतर फिनलँड, डेन्मार्क या देशांचा समावेश होता. इरिट्रेईआ Eritrea हा देश यादीमध्ये सर्वात तळाला आहे. चीनचा या यादीमध्ये 177 वा क्रमांक आहे, त्यांतर तुर्केमेनिस्तान 178 आणि उत्तर कोरिया 179 व्या स्थानी आहे. भारताचा या यादीत 142 वा क्रमांक आहे, मागीलवर्षीही भारताचे हेच स्थान होते. 2016 साली भारत या यादीमध्ये 133 व्या स्थानी होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात यात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

पत्रकारिता स्वातंत्र्यामध्ये भारताचे शेजारी नेपाळ 106 व्या स्थानी, श्रीलंका 127, म्यानमार 140, पाकिस्तान 145 आणि बांगलादेश 152 व्या स्थानी आहे. भारत पाकिस्तानपेक्षा तीन अंकानी पुढे आहे. रिपोर्टमध्ये भाजप समर्थकांनी दुषित केलेल्या वातावरणाला जबाबदार धरलं आहे. भाजपविरोधी वक्तव्य करणाऱ्याला 'देशद्रोही' ठरवले जाणे, याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांवरील पकड मजबूत केली आहे. 2020 मध्ये चार पत्रकारांची त्यांचे काम करत असताना हत्या झाली. त्यामुळे भारत पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश आहे. पत्रकारांना त्यांचे काम करण्यापासून रोखले जाते. पत्रकारांना पोलिसांकडून, राजकीय कार्यकर्त्यांकडून, भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांकडून त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा त्यांच्यावर हल्ले होतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार 2019 मध्ये पुन्हा निवडून आल्याने माध्यमांवरील दबाव आणखी वाढला आहे. देशात उजव्या विचारसरणीचा प्रबाव वाढला आहे. हिंदूत्ववादी नेत्यांविरोधात बोलणाऱ्या पत्रकारांविरोधात सोशल मीडियावर अभियान सुरु केले जात आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. विशेषत: महिलांना अधिक आक्रमकपणे टार्गेट केले जात असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT