नवी दिल्ली : पारंपारिक औषधांवरील संशोधनासाठी जगातील पहिले जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगर (Jamnagar) येथे उभारले जाणार आहे. यासाठी आयुष विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात 25 मार्च रोजी जिनिव्हा येथे करार (Agreement) करण्यात आला आहे. या योजनेसाठी 250 दशलक्ष डॉलर खर्च केले जाणार आहेत. या सामंजस्य करारावर आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम (WHO Chief) यांनी स्वाक्षरी केली. (Global Center For Traditional Medicine )
जामनगर, गुजरातमधील ग्लोबल सेंटर जगाला सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. जागतिक केंद्र जगाला उत्तम आणि स्वस्त वैद्यकीय उपाय उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आशा या उपक्रमावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
21 एप्रिल रोजी होणार भव्य भूमिपूजन
जगातील पहिल्या ग्लोबल सेंटरच्या स्थापनेचे भूमिपूजन 21 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद मोदीही (Narendra Modi) सहभागी होऊ शकतात. GCTM हे पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असणार असून, हे पारंपारिक औषध पद्धती, उत्पादने आणि मानकांसाठी ठोस पुरावे प्रदान करण्याचे काम करणार असून, हे केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चांगले आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.