hotel food 
देश

Viral: शुद्ध नालायकपणा! 5 स्टार हॉटेलमध्ये फुकट जेवण्यासाठी कपलचा 'जुगाड' जाणून घ्याच

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर सद्या एका जोडप्याचा किस्सा व्हायरल होत आहे. फाईव स्टार हॉटेलमध्ये फुकट जेवण्यासाठी या जोडप्याने एक युक्ती लढवली आहे. अनेकांसाठी हा किस्सा आश्चर्यचकित करणारा आहे. उदित भंडारी नावाच्या एका युझरने यासंदर्भातील किस्सा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर यावर युझर्स सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

उदित भंडारी यांनी गुरुग्राममधील एका जोडप्याचा किस्सा शेअर केला आहे. हे जोडपे नेहमी मोठ्या हॉटेलमध्ये मोफत जेवण जेवतं. मोफत जेवण करण्यासाठी त्यांनी लढवलेली युक्ती तशी चुकीची आहे. पण, यावर युझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. भंडारी यांनी सांगितलं की, या जोडप्याला ते गुरुग्राममध्ये एक मित्राच्या घरी भेटले होते. यावेळी या जोडप्याने मोफत जेवण करण्याची ते काय शक्कल लढवतात हे सांगितलं होतं.

काय आहे जुगाड?

जोडपे कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाते. तिथे जेवण मागवतात आणि पोटभर जेवण करतात. जेवण झाल्यानंतर जेवणाच्या एका प्लेटमध्ये माशी टाकतात. त्यानंतर ते हॉटेलमधील मॅनेजरला बोलवतात आणि याबाबत तक्रार करतात. तुम्ही कसलं जेवण देत आहात असं म्हणत गोंधळ घालतात. हॉटेलच्या बदनामीच्या भीतीने मॅनेजर जोडप्याचे बील माफ करते. त्यामुळे त्यांना मोफत जेवायला मिळते.

जोडपे या सर्व प्रकाराला मजा म्हणून पाहते. विशेष म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे अशातलीही गोष्ट नाही, असं भंडारी यांनी सांगितलं. ते पुढे सांगतात, जोडप्याला हे सांगताना खूप आनंद होत होता. अनेकदा अशा प्रकारचे फुकट जेवण केल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं.

सोशल मीडियावर या जोडप्यावर टीका केली जात आहे. एकाने प्रतिक्रिया दिलीये की, जोडप्याकडे पैशाची कमी नाही, पण थोडी नैतिकतेची कमी दिसत आहे. एकाने म्हटलं की, अनेक श्रीमंत लोक असं करत असतात. अर्धवट जेवण झाल्यानंतर लोक अन्नाबाबत तक्रार करतात आणि फुकट खाण्याचा प्रयत्न करतात.

(टीप- ही बातमी सोशल मीडियावरील युझरच्या पोस्टवरून केली आहे. सकाळ माध्यम याची पुष्टी करत नाही.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

Stock Market: चीनच्या शेअर बाजारात विक्रमी वाढ! सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे फायद्याचे?

Latest Marathi News Live Updates: मुंबईतील मीरा रोड परिसरात ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात गोंधळ

Varsha Usgaonkar : "माझ्या भावनांचा उद्रेक होईल यासाठी टपून राहिले होते.." वर्षा उसगांवकरांनी केले खुलासे

Rahul Gandhi यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणं ही दुर्देवी घटना, शिंदे गटाच्या आमदाराची जीभ पुन्हा घसरली!

SCROLL FOR NEXT