Brij Bhushan Sharan Singh esakal
देश

Wrestlers Protest: बृजभूषण सिंहांना अटक होणार? तुषार मेहतांची सुप्रीम कोर्टाला महत्वाची माहिती

ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंच्या आंदोलनावर अखेर घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Wrestlers Protest: ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूचं आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे, त्यांना आता इतर खेळाडूंचाही पाठिंबा मिळतो आहे. त्याचबरोबर मोदी सरकारवर गंभीर आरोप असलेल्या खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढतोय.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलीस आजच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात FIR दाखल होणार हे निश्चित झालं आहे. (Wrestlers Protest FIR will by filed against Brijbhushan Singh Solicitor General Tushar Mehta to SC)

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी महिला खेळाडूंनी महासंघाकडे तीन महिन्यांपूर्वीच केल्या आहेत. त्याचवेळी हे खेळाडू आंदोलनासाठी देखील बसले होते. पण चौकशीनंतर कारवाईचं आश्वासन त्यांना देण्यात आलं, पण अद्यापही याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्यानं हे आंदोलक खेळाडू पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. तसेच त्यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली.

सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

आंदोलक खेळाडूंची याचिका सोमवारी प्राप्त झाली. या याचिकेत खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेची दखल घेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली असून आज सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांच्यावतीनं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी आजच बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यामागणीसाठी ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक महिला खेळाडू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनासाठी बसल्या आहेत. यापूर्वीच सिंह यांच्या गैरकृत्यांची माहिती दिल्यानंतरही गेल्या चार महिन्यांपासून सरकार कारवाईबाबत उदासिनता दाखवत असल्यानं या खेळाडूंनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT