नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक छळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष स्वतः समोर असून त्यांनी स्वतःचा बचाव केला आहे. तसेच कुस्तीपटू आपल्याविरोधात कारस्थान रचत असल्याचं म्हटलं. आता कुस्तीपटू विनेश फोगाटने ब्रिजभूषण सिंगच्या दाव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटने म्हटलं की, मी केवळ चारवेळा नॅशनल खेळले नाही. मागील १४ वर्षे मी नॅशनल खेळले असून आजही खेळणार आहे. बजरंग आणि इतर खेळाडू देखील ट्रायल देऊनच गेले आहेत. कोणताच खेळाडू देशापेक्षा मोठा नाही. नॅशनलचे नियम बदलण्याच्या चर्चा निराधार आहे. तर बजरंग पुनियाने प्रश्न उपस्थित केला की, तक्रार देणारी खेळाडू अल्पवयीन आहे, हे बृजभूषणला कसं कळलं?
कुस्तीपटू बजरंगने पुढं म्हटलं की, आम्ही घटनात्मक पदावर असलेल्या प्रत्येकाचा आदर करतो. आम्ही असं काहीही बोलत नाहीत, ज्यामुळे कुणाच्या प्रतिमेला धक्का बसेल. पण मग आमचाही मानसन्मान आहे. त्यामुळे समितीतील गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते, याविषयी खुलासा द्यायला हवा. येथील वीज, पाणी कपात करण्यात आली असून बेड देखील नाही. पूर्वी आमची मजबुरी होती.
आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा देणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नसल्याचं म्हटलं. मात्र गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच “मी पूर्णपणे निर्दोष आहे आणि माझा सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचंही ब्रिजभूषण यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.