xiaomi reacts on 8-year-old girl dies after smartphone blast while watching video on smartphone  
देश

Smartphone Blast : व्हिडीओ पाहताना झालेल्या फोनच्या स्फोटात ८ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; आता कंपनी म्हणते…

8-year-old girl dies in Smartphone Blast : स्मार्टफोनचा स्फोट झाल्याने काही दिवसांपूर्वी आठ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे

रोहित कणसे

Xiaomi Smartphone Blast : स्मार्टफोनचा स्फोट झाल्याने काही दिवसांपूर्वी आठ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे.फोन वापरताना हातात फोनचा स्फोट झाल्याने मुलाचा जीव गेला. दरम्यान आता या दुर्दैवी प्रकारानंतर या भीषण घटनेवर शाओमी कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

कंपनी काय म्हणते?

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाओमी कंपनीने म्हटले आहे की, शाओमी इंडिया ही कंपनीसाठी ग्राहकांची सुरक्षितता सर्वोतपरी आहे आणि आम्ही या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली आहे. या कठीण प्रसंगात आम्ही कुटुंबासमवेत आहोत आणि त्यांना शक्य ती मदत करण्यात येईल. सध्या या प्रकरणचा तपास सुरू असून या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आधिकाऱ्याच्या मदतीने काम सुरू आहे. तसेच त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार ८ वर्ष वय असलेली आदित्यश्री ही दुर्घटनेच्या वेळी फोनवर व्हिडीओ पाहात होती. ही घटना २४ एप्रिल रोजी केरळच्या त्रिस्सूरमध्ये रात्री १०.३० वाजता घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलीच्या हातात होता तो स्मार्टफोन Redmi Note 5 Pro होता. फॉरेंसिक एक्सपर्ट्सनुसार स्फोट झाला तेव्हा फोन चार्ज होत नव्हता.

दरम्यान शाओमीने म्हटलं आहे की काही रिपोर्ट फोन रेडमीचा असल्याचे सांगत आहेत, मात्र अद्याप याबद्दल स्पष्ट झालेले नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार चिमुरडी खूप जास्त वेळापासून फोनमध्ये व्हिडीओ पाहत होती आणि फोन ओव्हरहीट झाल्याने फोनचा स्फोट झाला. हा स्फोट मुलीसाठी जीवघेणा ठरला.

काय झालं होतं?

फॉरेंसिक टीमने या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल स्थानिक पोलिसांना दिला आहे आणि अधिकच्या तपासासाठी घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिश्रीच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या होता. तर हाताला देखील गंभीर इजा झाली होती.

वडिल म्हणतात..

मुलीचे वडिल अशोक कुमार यांनी सांगितेल की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्यांची मुलगी तीच्या आजीसोबत घरी होती. आजीने पोलीसांना सांगितले की, मुलगी पांघरून घेऊन आतमध्ये मोबाईलवर गेम खेळत होती. तर त्या स्वयंपाकघरात जेवन घेऊन येण्याकरिता गेल्या होत्या. तेव्हा त्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यांनी जाऊन पाहिलं तर त्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या दरम्यान ब्लास्ट फोनमध्ये खूप वेळापर्यंत व्हिडीओ पाहिल्याने झाला असेही सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT