नवी दिल्ली : गेल्या ३५ वर्षांपासून उत्तरप्रदेशातील मैनपुरी या लोकसभा मतदारसंघांवर समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबीयांचे एकमुखी वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात गेल्या ३५ वर्षात यादवशिवाय कुणीही निवडून आलेला नाही. त्यामुळे यावर्षी सुद्धा खासदार डिंपल यादव याच निवडून येतील, याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही.
मैनपुरी मतदारसंघातील मतदारांची संख्या विचारात घेतली तर ४५ टक्के मतदार यादव आहेत. या यादवीच्या भरवशावर मुलायम सिंह यादव यांनी या मतदारसंघावर चांगली पकड बसविली आहे. कोणतीही लाट असो या मतदारसंघात केवळ यादवच निवडून येतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. परंतु त्यानंतर केवळ यादव येथून निवडून आलेले आहेत. यादवासोबत या मतदारसंघात मुस्लिम, अनुसूचित जाती-जमाती, शाक्य व ब्राह्मण समाजाचा सुद्धा प्रभाव आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मुलायम सिंह यादव निवडून आले. ते आझमगड आणि मैनपुरी या दोन्ही ठिकाणी विजयी झाले.
त्यामुळे मैनपुरीचा राजीनामा दिल्यानंतर तेथे पुन्हा पोटनिवडणूक झाली. त्यावेळी सपचे धर्मेंद्र यादव विजयी झाले. २०१९ मध्ये मुलायमसिंह यांनी पुन्हा मैनपुरीचा गड राखला. मात्र २०२२ मध्ये त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या स्नुषा डिंपल यादव यांनी बालेकिल्ला कायम राखला. या पोटनिवडणुकीत डिंपल यादव यांना एकूण मतदानापैकी ६४ टक्के मते मिळाली होती. यावेळी सुद्धा पुन्हा डिंपल यादव या मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे. यादव कुटुंबाचा असलेल्या बालेकिल्ल्यात त्यांचा वरचष्मा कायम राहील, असे बोलले जात आहे.
या मतदारसंघातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघांपैकी ३ ठिकाणी सपचे उमेदवारी विजयी झाले तर दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी मैनपुरी जिंकणारे भाजपचे आमदार जयवीर सिंह आहेत. भाजपने त्यांनाच यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. मैनपुरी विधानसभा निवडणुकीत सपच्या उमेदवारावर मात देणारे जयवीर सिंह यांच्यापुढे डिंपल यादव यांचे आव्हान आहे.
एकूण मतदार - १७ लाख ३० हजार
२०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल
डिंपल यादव (सप) - ६१८१२० (६४.०८ टक्के )
रघुराज सिंह शाक्य (भाजप)- ३२९६५९ (३४.०८ टक्के)
वर्चस्व
२०१९ : समाजवादी पक्ष
२०१४ (पोटनिवडणूक): समाजवादी पक्ष
२०१४: समाजवादी पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.