समाजवादी पक्षाचे प्रबळ नेते आणि आमदार आझम खान २७ महिन्यांनंतर शुक्रवारी (ता. २०) सीतापूर तुरुंगातून बाहेर आले. शिवपाल यादव यांनी त्यांचे स्वागत केले. परंतु, सपा प्रमुख अखिलेश यादव पोहोचले नाही. सीतापूर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आझम खान घरी पोहोचले त्याचवेळी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र चांगलेच व्हायरल होत आहे.
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबतच्या छायाचित्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक एकत्र बसलेले दिसत आहेत. यूपीच्या विधानसभेत ई-विधानसभा प्रणाली लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर योगी, अखिलेश, ब्रिजेश पाठक विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात ओम बिर्ला यांच्यासोबत चहा-नाश्ता करीत होते. त्यादरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी यूपी विधानसभेला पेपरलेस करण्यासाठी लागू केलेल्या ‘ई-विधान’ या नवीन तंत्रज्ञानाचा औपचारिक शुभारंभ केला. यावेळी सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंतचे नेते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशची विधानसभा बहुधा देशातील सर्वांत मोठी विधानसभा असेल. हे राज्य असे राज्य आहे जिथले खासदार देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय राजकारणातही उत्तर प्रदेशने विशेष भूमिका बजावली आहे, असे ओम बिर्ला म्हणाले.
लोकांच्या हिताचा विचार करण्यासाठी आम्ही आलो
उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) २५ कोटी लोकांच्या हिताचा विचार करण्यासाठी आम्ही आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रशासनाला तंत्रज्ञानाशी जोडण्याचे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल मिशनला बळ देत ‘वन नेशन वन ॲप्लिकेशन’ या भावनेने विधानसभेत ‘ई-विधान’ प्रणाली लागू करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) म्हणाले.
आता विधानसभा पेपरलेस
दोन वर्षांपूर्वी पेपरलेस बजेट सादर केले होते. ई-कॅबिनेट आणि ई-बजेटनंतर आता संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस झाले आहे. २३ मे पासून सुरू होणाऱ्या सत्रात आवश्यकतेनुसार कागदपत्रांच्या हार्डकॉपी उपलब्ध होतील. परंतु, आगामी सत्रापासून सर्व काही पूर्णपणे पेपरलेस होईल. आता आमदारांना घरात फार जाड पिशव्या आणण्याची गरज भासणार नाही, असेही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.