yogi balaknath clerifies on rajasthan cm race BJP chief minister announcement vasundhara raje  
देश

Rajasthan CM : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची चुरस वाढली! योगी बालकनाथ यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण

राजस्थानमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे

रोहित कणसे

राजस्थानमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणूकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान उद्या भाजप विधीमंडळ पक्षाची महत्वपूर्ण बैठक होणार असून त्यापूर्वी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या महंत बालकनाथ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी बालकनाथ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यादरम्यान बालकनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. "पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नतृत्वाखाली जनतेने पहिल्यांदा खासदार व आमदार म्हणून निवडणून देत राष्ट्रसेवेची संधी दिली . निवडणूक निकालानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजून पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे" असं म्हटलं आहे.

दरम्यान बालकनाथ यांच्या या स्पष्टीकरणानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना अजून वाट पाहा असा सल्ला दिल्याची चर्चा आहे. काही राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे की आता बालकनाथ आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. दरम्यान भाजपच्या बैठकीनंतरच मुख्यमंत्रपद कोणाला मिळणार हे ठरणार आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

जाणकारांच्या म्हणण्यानुसार भाजपचे राष्ट्रीय नेतृत्वाला जर वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री करायचे असते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलं गेलं असतं. मात्र तसं करण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरं महत्वाचं पद सोपवलं जाऊ शकतं. तसेच वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांना उपमुख्यमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं किंवा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मात्र सध्या यावर चर्चाच सुरू आहेत.

राजस्थानात मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहरा दिला जाऊ शकतो. मात्र हा चेहरा कोणाचा असेल हे अद्याप स्पष्ट नाहीये. सध्या या शर्यतीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावर, ओम माथुर, दीया कुमारी, किरोडी लाल मीणा आणि वसुंधरा राजे यांची नावे चर्चेत आहेत. उद्या म्हणजेच १० डिसेंबर रोजी जयपूरमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राजस्थानातील राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT