Arya Rajendran Kerala Dev  
देश

राजकारणातील सर्वात कमी वयाची 'जोडी' अडकणार 'लग्नाच्या बेडीत'

सध्या सोशल मीडियावर राजकीय विश्वातील एक बातमी (Soial Media) लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Viral News: सध्या सोशल मीडियावर राजकीय विश्वातील एक बातमी (Soial Media) लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यामध्ये देशातील सर्वात कमी वयाचे महापौर आणि आमदार यांनी लग्न करणार असल्याचे जाहिर केलं आहे. केलं आहे. या बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण शाहरुख (Shahrukh Khan) आणि अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) रब ने बना दे जोडी नावाचा चित्रपट पाहिला आहे. त्याच धर्तीवर पॉलिटिक्सनं बनवली जोडी...अशा प्रकारच्या कमेंट्स या दाम्पत्याला मिळाल्या आहेत. त्रिवेंद्रमपूरम मधील महापौर आर्या राजेंद्रन (Arya Rajendran Kerala) आणि सीपीआयचे पक्षाचे आमदार सचिन देव (MLA KM Sachin Dev) हे विवाहबंधनात अडकणार आहे.

याविषयी सांगताना महापौर आर्या यांनी सांगितलं की, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून यासगळ्या निर्णयप्रक्रिकेत घरच्यांनाही सहभागी करुन घेणार आहे. लग्न हा काही शेवटचा शब्द नाही. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर्या यांनी आपल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीनं विचार करुन योग्य ती तारिख ठरवली जाणार आहे. यावेळी कुणाला बोलवायचे कुणाला नाही याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. आर्या राजेंद्रन या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्या आहेत. त्या त्रिवेंद्रमपूरमच्या महापौर आहेत. 2020 मध्ये त्या 21 वर्षांच्या असताना देशातील सर्वात कमी वयाच्या महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

देव हे सीपीआय पक्षाचे सदस्य आहेत. केरळ विधानसभेचे सर्वात तरुण आमदार असणारे देव हे बलुसरी हे मतदारसंघाचे आमदार आहेत. देव आणि राजेंद्रन हे एकमेकांना विद्यार्थी संघटनेत असल्यापासून ओळखत होते. त्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.आणि ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आम्ही लग्नाचा निर्णय हा काही एकट्यानं घेतलेला नाही. त्यामध्ये कुटूंबियांना देखील सहभागी करुन घेतले आहे. त्यांचे मतही विचारात घेणार असल्याचे देव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT