Saket Court Delhi Dhruv Rathee And Elvish Yadav Esakal
देश

Youtuber Dhruv Rathee: यूट्यूबर ध्रुव राठी अडकणार? दिल्ली कोर्टाने जारी केले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Elvish Yadav: आता या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. ध्रुव राठीने समन्स स्पीड पोस्ट, कुरिअर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही पाठवावेत, असे न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

आशुतोष मसगौंडे

भाजप नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने YouTuber ध्रुव राठी याला समन्स बजावले आहे.

सुरेश नखुआ यांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला आहे की, ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांना "हिंसक आणि अपमानास्पद ट्रोल" म्हणत त्यांचा अपमान केला आहे.

बार आणि बेंच संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या साकेत न्यायालयाने राठीला २९ जुलै रोजी समन्स बजावले आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी केली.

आता या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. ध्रुव राठीने समन्स स्पीड पोस्ट, कुरिअर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही पाठवावेत, असे न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

ध्रुव राठीने 7 जुलै 2024 रोजी YouTube वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओचे शीर्षक होते, "My Final Reply to Godi Youtubers."

नखुआ यांनी ध्रुव राठीच्या या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला आणि ते म्हणाले की, "ध्रुव राठीने केलेल्या आरोपांमुळे त्यांना (नखुआ) लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे."

नखुआ म्हणाले, "व्हिडिओमध्ये केलेले सर्व आरोप निराधार आहेत. हे आरोप दुर्भावनापूर्ण पद्धतीने करण्यात आले आहेत."

याचिकेत नखुआंच्या वकिलाने म्हटले आहे की, "यामुळे याचिकाकर्त्याच्या चारित्र्यावरच शंका निर्माण होत नाही तर समाजात त्याला मिळालेला आदरही कलंकित होतो."

ध्रुव राठीच्या व्हिडिओचे परिणाम दूरगामी होऊ शकतात, असे याचिकेत म्हटले आहे. यामुळे लोकांचा त्याच्यावरचा (नखुआ) विश्वास कमी होऊ शकतो. खटला दाखल करताना, त्यांनी म्हटले होते की या व्हिडिओमुळे त्याच्या (नखुआ) वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांवर कधीही भरून न येणारा परिणाम झाला आहे. त्याचा प्रभाव कधीही पूर्णपणे जाणार नाही.

दरम्यान एल्विश यादव दररोज ध्रुव राठीच्या विरोधात व्हिडिओ बनवतो. अशा स्थितीत ध्रुव राठीही एल्विश यादवला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देतो. मात्र, ध्रुव राठी यांच्याबाबतीत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ध्रुव राठीने अनेकदा वादग्रस्त व्हिडिओ बनवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT