YouTuber Harsha Sai 
देश

YouTuber Harsha Sai : खोऱ्याने पैसे वाटणाऱ्या युट्यूबर गोत्यात! ब्लॅकमेल करून अभिनेत्रीचा बलात्कार केल्याचा आरोप

रोहित कणसे

प्रसिद्ध यूट्यूबर हर्षा साई याच्यावर एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा तसेच तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर हैद्राबाद येथील नारसिंगी पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान यूट्यूबरवर गंभीर आरोप करणारी २५ वर्षीय अभिनेत्री मुंबईची असून यापूर्वी तीने काही टीव्ही रिअॅलिची शोमध्ये देखील काम केले आहे. तसेच हर्षा साई सोबत एक वर्षभरापूर्वी आलेल्या चित्रपटात देखील ती मुख्य भूमिकेत होती.

दरम्यान या प्रकरणी महिलेला वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून प्रकरणचा तपास सुरू असल्याचे नारसिंगी पोलिसांनी सांगितले. मात्र या प्रकरणात हर्षा साई याला अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री हर्षा साई याला पहिल्यांदा एका मित्राच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये भेटली होती. येथे दोघांची ओळख झाली आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकेच नाही तर हर्षा साई याने तिला लग्नाचे वचन दिले आणि तिच्यावर कथितरित्या बलात्कार केला.

यासोबतच त्याने कथितरित्या अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करू लागला, या प्रकारानंतर अभिनेत्रीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षा साई कोण आहे?

हर्षा साई हा एक प्रसिद्ध यूट्यूबर असून तो हर्षा साई : फॉर यू हे तेलगु यूट्यूब चॅनल चालवतो. त्याचे तब्बल १५.५ मिलीयन फॉलोअर्स आहेत. तो विशेषतः गरीब गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणाऱ्या व्हिडीओसाठी ओळखला जातो. लोकांना हजारो-लाखो रुपयांची आर्थिक मदत करतानाचे हर्षा साईचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याला भारताचा 'मिस्टर बिस्ट' देखील म्हटले जाते.

दरम्यान यूट्यूबर हर्षा साई विरोधात कथितरित्या बलात्कार यासोबतच महिलेचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : रतन टाटा यांची प्रकृती स्थिर

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT