Shikha Matrey arrestd 
देश

YouTuber: 'कुवांरी बेगम'ला अखेर अटक! लहान मुलांचा लैंगिक छळ कसा करायचा हे शिकवणारी शिखा मात्रे कोण?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गाझीयाबादमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय शिखा मात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. शिखा मात्रेचे कुंवारी बेगम नावाचे युट्यूबवर चॅनल आहे. यावर तिने लहान मुलांचा लैंगिक छळ कसा करायचा याचे काही व्हिडिओ अपलोड केले होते. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. एकम न्यायच्या संस्थापक आणि स्वतंत्र पत्रकार दिपिका नारायण भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिपिका यांनी सर्वात आधी कुंवारी बेगमच्या मजकुराबाबत आक्षेप घेतला होता. पॉर्नोग्राफिक आणि लहान मुलांच्या लैंगिक छळासाही प्रोत्साहन देणारे व्हिडिओ शेअर केले जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणी त्यांनी पोलिसांना फोन करुन कळवलं होतं. कुशंबी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्रे हिला अटक करण्यात आली.

एसीपी रितेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मात्रेने चौकशीदरम्यान कबुल केलंय की, ती काही पॉर्नोग्राफिक व्हिडिओ टाकत होती. तिने सांगितलं की, तिला हस्तमैथुनाचे व्हिडिओ शेअर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तिने अशाप्रकारचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली होती. इतर काही युट्यूबरनी शिखा मात्रे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिखा मात्रे उर्फ कुंवारी बेगम कोण आहे?

पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीमधून शित्राने पदवी घेतली आहे. ती दिल्लीतील एका कंपनीमध्ये काम करत आहे. पोलीस तिला अटक करू शकतात याची जाणीव होताच तिने सर्व व्हिडिओची सेटिंग पब्लिक वरुन प्रायव्हेट केली. त्यानंतर तिने एक-एक करून आक्षेपार्ह व्हिडिओ डिलिट केले. त्यानंतर तिने तिचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिवेट केले.

पोलीस याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांची देखील चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सांगितलं की, यूट्यूब अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून व्हिडिओ कायमस्वरुपी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कशाप्रकारचे व्हिडिओ शिखाने बनवले होते?

शिखाने कुंवारी बेगम नावाचे युट्यूब चॅनल सुरू केले होते. व्हिडिओच्या माध्यमातून ती लोकांना लैंगिक कृतीसाठी प्रवृत्त करायची. एका व्हिडिओमध्ये शिखाने नव्याने जन्मलेल्या मुलांचा कसा छळ करायचा हे सांगितलं होतं. याच नावाने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला २,०५० सबस्क्रायबर्स आहेत. तिने आतापर्यंत ११५ व्हिडिओ अपलोड केलेत. अटकेपूर्वी तिने आक्षेपार्ह व्हिडिओ डिलिट केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT