youtubers and influencers propagating Chinese agenda 
देश

YouTubers : पैसे घेऊन Vlog मध्ये चीनची वाहवा? देशातील बडे मीडिया इन्फ्लुएन्सर्स सरकारच्या रडारवर

youtubers and influencers propagating Chinese agenda : यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही काही दिवसांमध्ये अनेक चीनी व्लॉग पाहिले आसतील. यामध्ये चीनचा चांगुलपणा आणि विकासाबद्दल माहिती देण्यात देण्यात आली आहे.

रोहित कणसे

Youtubers and Influencers Latest News : यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही काही दिवसांमध्ये अनेक चीनी व्लॉग पाहिले आसतील. यामध्ये चीनचा चांगुलपणा आणि विकासाबद्दल माहिती देण्यात देण्यात आली आहे. भारतासह अनेक देशातील बऱ्याच व्लॉगर्सनी काही दिवसांपूर्वी चीनला भेट दिली. या भेटीमध्ये या व्लॉगर्सनी वुहान, तिबेट, शिनजियांग सारख्या चीनमधील वादग्रस्त ठिकाणांचे व्लॉग प्रसिद्ध करण्या आले. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांना यामध्ये एक जोरदार प्रोपगंडा केला जात असल्याचा संशय असून याबद्दल केंद्र सरकारला अलर्ट देखील करण्यात आलं आहे.

भारतातील तब्बल एक डझनहून अधिक यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे भारतीय सुरक्षा एजन्सीजच्या रडारवर आले आहेत. सुरक्षा यंत्रणांना सशंय आहे की, या व्लॉगच्या आडून इन्फ्लुएन्सर्स चीन सरकारचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी काम करत आहेत.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, साउथ ब्लॉक येथे चीनसंबंधी विषयांवर लक्ष ठेवणाऱ्या एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीवरून असे व्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची एक लिस्ट बनवण्यात आली आहे आणि कारवाईसाठी केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की कथितरित्या आर्थिक लाभासाठी प्रभावशाली लोक चीनच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यांचा अजेंडा पुढे नेत आहेत. यामुळे भारतासाठी धोका उत्पन्न होऊ शकतो. या व्लॉगर्सचे लाखांमध्ये फॉलोवर्स आणि सब्सक्राइबर्स आहेत म्हणून या लोकांच्या पोस्ट लोकांवर प्रभाव पाडू शकतात.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की चीनी कम्युनिस्ट पत्र (सीसीपी)चं राजकारणाचा हिस्सा आहे. याअंतर्गत चीन आपला प्रोपगंडाला आकार देण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी भारतासारख्या विरोधी देशांमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करत आहे. यामागचा मुख्य उद्देश जगभरात चीनविरोधात असलेल्या निगेटीव्ह मीडिया रिपोर्टींग आणि रिसर्ज खोडून काढणे आणि विदेशी सराकरांचे म्हणणे खोडून काढणे आहे.

रिपोर्टनुसार सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली आहे की, संशयित व्लॉगर्सचा खर्च चीनने केला आहे आणि त्यांना शिनजियांग आणि तिबेट सारख्या बंदी असलेल्या प्रदेशांचा एक्सेस देखील देण्यात आला. या यूट्यूबर्सचे व्हिडीओ चीनच्या बाजूनेत आहेत. यामध्ये ते जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की शिनजियांग मध्ये उइगर मुस्लिमांचा नरसंहार झालाच नाही. तसेच शिनजियांग आणि तिबेटमध्ये चीनी शासनाअंतर्गत सर्वकाही शांततेत शुरू आहे. वुहानबद्दल जगभरात प्रचार करण्यात येत आहे की ते एक अत्यंत विकसीत शहर आहे आणि कोरोना पसरण्यात शहराचा कुठलाच हातभार नव्हता.

सुरक्षा यंत्रणांचा संशय तेव्हा बळावला जेव्हा चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स खासकरून भारताच्या व्लॉगर्सची स्तुती करू लागले. ग्लोबल टाइम्सने जून २०२३ मध्ये एक ट्वीट केलं होतं. यामध्ये चीनला भोटे देण्यासाठी आलेले अनेक विदेशी बॅगपॅकर्सपैकी तीन भारतीय व्लॉगर्स प्रमुख आहेत. त्यांच्या काही व्हिडीओना यूट्यूबवर एक मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि भारतीय नागरिकांनी कमेंट देखथील केले आहेत. ज्यानुसार चीनमधील काही गोष्टी दाखवणारे व्हिडीओ फेक न्यूज आणि द्वेषपूर्ण वातावरणात मोठा गैरसमज दूर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

Assembly Election Voting 2024 : मतदान केंद्रावर राडा नडला! मतदान संपण्याआधीच उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Jharkhand Exit Poll: झारखंडमध्ये भाजप आघाडीला बहुमत; काय सांगताएत एक्झिट पोल?

Paithan Assembly Constituency Voting : आडुळ येथे शांततेत मतदान राञी उशीरा पर्यंत रांगा...

SCROLL FOR NEXT