Andhra Pradesh sakal
देश

Andhra Pradesh : आंध्र सरकार विरोधात ‘वायएसआर कॉँग्रेस’चे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी राज्यातील नवनिर्वाचित तेलगू देसम पक्षाविरोधात जंतर मंतरवर धरणे आंदोलन केले. चंद्राबाबू नायडू यांचे सरकार हिंसा पसरवत असून वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप जगनमोहन यांनी यावेळी केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन रेड्डी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

अलिकडेच झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने वायएसआरचा धुव्वा उडवला होता. लोकसभेत वायएसआरचे चार तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. आमच्याकडे अजून १५ खासदार आहेत, याची जाणीव ठेवावी, असा सूचक इशारा रेड्डी यांनी भाजपला उद्देशून जंतर मंतरवर दिला.

निवडणुका पार पडल्यानंतर मागील ४५ दिवसांत ३० लोकांच्या हत्या झाल्या आहेत. अनेक लोकांच्या संपत्तीला नुकसान पोहोचवण्यात आले आहे. मुख्यमंत्री नायडू यांचे पुत्र नारा लोकेश हे राज्यभर फिरुन एक लाल डायरी दाखवत आहेत. आगामी काळात लक्ष्य केल्या जाणाऱ्या नेत्यांची नावे या डायरीत असल्याचे ते सांगत आहेत, असा आरोप रेड्डी यांनी केला.

सप नेते अखिलेश यादव, रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी जगनमोहन रेड्डी यांची भेट त्यांना पाठिंबा जाहीर केला. ज्या नेत्यांनी रेड्डी यांची भेट घेतली, त्यात शिवसेना (उधद्व ठाकरे) नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, अरविंद सावंत, तृणमूल काँग्रेसचे नजीबुल हक, झारखंड मुक्ती मोर्चाचे विजय हांसदा, आम आदमी पक्षाचे राजेंद्रपाल गौतम आणि अण्णा द्रमुकचे थंबी दुराई यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT