Zakia Wardak Esakal
देश

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

Afghan Diplomat Smuggling Gold: झाकिया यांनी दुबईहून कपडे आणि बेल्टमध्ये लपवून सुमारे 19 कोटी रुपयांचे सोने आणले होते, परंतु मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

आशुतोष मसगौंडे

भारतातील सर्वात वरिष्ठ अफगाण राजदूत झाकिया वर्दक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वास्तविक, त्यांना गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर दुबईतून सुमारे 19 कोटी रुपयांच्या 25 किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते, परंतु त्या परदेशी मुत्सद्दी असल्याने अटकेपासून बचावल्या होत्या.

आपल्यावरील वैयक्तिक हल्ले आणि सतत होत असलेली बदनामी हे त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले असले तरी त्यांच्या राजीनाम्याचा संबंध सोने तस्करी प्रकरणाशी जोडला जात आहे.

मुंबईतील अफगाणिस्तानचे कौन्सुल जनरल असण्यासोबतच वारदक नवी दिल्लीत अफगाणिस्तानचे कार्यवाह राजदूत म्हणूनही काम पाहत होत्या.

झाकिया यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे गेल्या एका वर्षात केवळ मलाच नाही तर माझ्या जवळच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांनाही अनेक वैयक्तिक हल्ले आणि बदनामींना सामोरे जावे लागले आहे. या संघटित हल्ल्यांमुळे माझी भूमिका प्रभावीपणे पार पाडण्याची माझी क्षमता बिघडली आहे.

भारतात त्यांना मिळालेला आदर आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या अतुट पाठिंब्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

झाकिया यांनी दुबईहून कपडे आणि बेल्टमध्ये लपवून सुमारे 19 कोटी रुपयांचे सोने आणले होते, परंतु मुंबई विमानतळावर पकडण्यात आले. असे म्हटले जाते की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्यानंतर सुमारे 12 तास त्यांची चौकशी केली परंतु त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्याने अटकेपासून बचावल्या.

परदेशी राजदूतांना राजनैतिक प्रतिकारशक्ती असते आणि त्यांना अटक करता येत नाही. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांची मुंबईतील अफगाण वाणिज्य दूतावासात नियुक्ती झाली होती. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानी राजवट लागू झाली नव्हती. त्या अफगाणिस्तानच्या एकमेव महिला राजदूत होत्या. काही काळ दिवसांपासून त्या दिल्लीतील अफगाण दूतावासाचे कामही पाहत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT