Zarin Khan Arrest Warrant:बॉलिवुड अभिनेत्री झरिन खान विरोधात कोलकातामधील एका न्यायालयाने अटकेचं वॉरंट जारी केलं आहे. तिच्यावर कथितरित्या फसवणुकीचा आरोप आहे. २०१८मध्ये तिच्या विरोधात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात चार्जशीट सादर केली होती.
मात्र, त्यानंतर झरिनने जामीनासाठी अर्ज केला नाही, ना ती न्यायालयासमोर हजर झाली. सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने तिच्याविरोधात अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं. या प्रकरणाबद्दल झरिन खान स्वत: हैराण झाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर, 2018 मध्ये झरिन खान कोलकाता येथे एका दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. आयोजक तिच्या येण्याची वाट पाहत राहिले पण ती आली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयोजकाने झरिन खान आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली.
त्यानंतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. झरिन खान चौकशीसाठी आली नाही. आयोजकांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते.
नंतर त्यांच्या टीमला कळाले की हा कार्यक्रम फारच कमी प्रमाणात आहे. विमान तिकीट आणि निवास व्यवस्था याबाबत योग्य माहिती मिळाली नाही, त्यानंतर शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचही त्याने सांगितले.(Latest Marathi News)
जामीनासाठी नाही केला अर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झरिन खानने आयोजकांविरोधात स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. चौकशीअंती तिच्यावर आणि त्याच्या व्यवस्थापकावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी तिच्या मॅनेजरने कोर्टात हजर राहून जामीन मागितला असताना अभिनेत्रीने तसे केले नाही.
या प्रकरणी झरिन काय म्हणाली?
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर इंडिया टुडे ग्रुपशी बोलताना झरिन खान म्हणाली, 'मला खात्री आहे की त्यात तथ्य नाही. मलाही धक्का बसला आहे आणि मी माझ्या वकिलांच्या संपर्कात आहे. मी तुम्हाला नंतर स्पष्टपणे सांगू शकेन. तुम्ही आता माझ्या पीआरशी या विषयावर बोलू शकता."(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.