नवी दिल्ली: "महाविकास आघाडी सरकारने (mva govt) ओबीसी आरक्षण (obc reservation) रद्द होऊ नये, यासाठी सुप्रीम कोर्टात (supreme court) बाजू मांडली नाही. इम्पिरिकल डाटा दिला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका घ्याव्या लागल्या" असं केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे (Raosasheb danve) यांनी म्हटलं आहे.
"जनमताचा कौल राज्यातला ओबीसी समाज भाजपाच्या बाजूने आहे. सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी ही निवडणूक झाली. भाजपा एकटी २२ जागांवर जिंकली शिवसेना सात जागांवर, काँग्रेस १२ आणि एनसीपीने १० जागांवर विजय मिळवला" असे दानवे म्हणाले.
"भाजपाच्या बाजूने बहुमत आहे. तीन पक्ष असताना भाजपा एकटा लढतोय अशा परिस्थितीतही भाजपाच्या बाजने कौल दिला आहे. या सरकारवर ओबीसी समाज नाराजा असल्याचे दिसून येते. अनिल देशमुख यांच्या कटोलमध्ये भाजपा उमेदवार निवडून आला, हा सरकार विरोधात जनतेने व्यक्त केलेला अंसतोष आहे" असे अनिल देशमुख म्हणाले.
"अजून एक मिनी विधानसभेची निवडणूक बाकी आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत त्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरेल" असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.