Exam Result sakal
एज्युकेशन जॉब्स

Open School : राज्य मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीच्या मूल्यमापनाचा १०० टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मूल्यमापनात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मूल्यमापनात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या मूल्यमापनाचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) आणि इयत्ता आठवीच्या (उच्च प्राथमिक स्तर) मूल्यमापनासाठी राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळामधून एकूण ९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी ३५ आणि आठवीसाठी ५१ विद्यार्थी असे एकूण ८६ विद्यार्थी प्रत्यक्ष मूल्यमापनासाठी प्रविष्ट झाले. अंतिम मूल्यमापनानुसार पाचवीच्या ३५ आणि आठवीच्या ५१ विद्यार्थ्यांनी अर्हता आणि विद्याविषयक कौशल्ये प्राप्त केले असून निकालाची टक्केवारी १०० आहे.

या मूल्यमापनात विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबर २०१८च्या शासन निर्णयानुसार आवश्यक सर्व सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT