10th & 12th Board Preparation know few tips while giving exam and going for exam  
एज्युकेशन जॉब्स

10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाताना आणि पोहोचल्यानंतर 'या' गोष्टी नेहमी ठेवा लक्षात 

अथर्व महांकाळ

नागपूर : परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ताण असतो. केलेला अभ्यास आपल्याला लक्षात राहील का? वेळेवर उत्तरं आठवतील का? असे अनेक प्रश्न त्यांना पडले असतात. त्यामुळे अतिरिक्त तणाव निर्माण होतो. परीक्षेच्या दिवशी अचानक घाई होऊ लागते. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचंही टेन्शन वाढण्यास सुरुवात होते. मात्र यामुळे अनेकदा विद्यार्थी करू नये ती चूक करून बसतात. परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो घाबरू नका. परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.   

परीक्षेच्या किमान २ तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन २ मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा. स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा. त्यानंतर आपली सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जा. किमान १ तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल. 

हॉल तिकीट विसरु नका

परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका. तसंच सोबत २-३ पेन . पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्वाच्या सर्व गोष्टी आठवणीनं घ्या. यासाठी वस्तूंची यादी बनवून घ्या आणि ती भिंतीवर लावून ठेवा. यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील. 

हॉल तिकीट हरवलं तर? 

अशा वेळी घाबरू नका. लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकारांना याबाबत माहिती द्या. तसंच त्यांना हॉल तिकिटशिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा. मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटाची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवा. जर तुमचं हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना ही झेरोझ दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा. हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. 

पोहोचण्यास उशीर झाला तर?

अनेकदा ट्रॅफिकमुळे किंवा इतर काही कारणांमुळे परीक्षेच्या सेंटरवर पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. मुद्दाम केलं नसेल तरी वेळ पाळली नाही म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका उशिरा मिळते. अशावेळी चिंता करू नका. वर्गातील शिक्षकांना तुमच्या उशिरा येण्याचं कारण नम्रपणे समजवून सांगा. तसंच त्यांना काही वेळ अधिक देण्याची मागणी करा. तुमचं कारण त्यांना पटलं तर महाल काही वेळ मिळू शकतो. 

पाण्याची बाटली जवळ बाळगा 

उन्हळ्याच्या दिवसांत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा भरपूर लांबून सेंटरला पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. अशावेळी तुमच्याजवळ स्वतःची पाण्याची बाटली नसल्यास तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसंच परीक्षेत तुमचं लक्ष लागू शकत नाही. म्हणूनच परीक्षेला जाताना नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली जरूर ठेवा 

तुमच्या जागेवर कुठला कागद दिसला तर? 

परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात. असा कुठला कागद तुमच्या जागेजवळ असला तर त्याला हात लावण्याआधी वर्गातील शिक्षकांना सांगा. असं केल्यामुळे कुठलाही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही. तुम्ही शांतपणे आपला पेपर देऊ शकाल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT