10th & 12th Board Preparation know how to study in ideal way  
एज्युकेशन जॉब्स

10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो 'या' पद्धतीनं अभ्यास कराल तर उत्तरं नेहमीसाठी राहतील स्मरणात; जाणून घ्या 

अथर्व महांकाळ

नागपूर : अगदी लहानपणापासून अभयास कर, अभ्यास कर म्हणून पालक आपल्या मागे लागतात. पहिल्या वर्गापासून तर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत एक गोष्ट तुम्हाला सातत्यानं करावी लागते ती म्हणजे अभ्यास. अभ्यास केला नाहीस तर पास होणार नाहीस असं मोठी माणसं नेहमी म्हणत असतात. मात्र अभ्यास नक्की कसा करावा? कुठे करावा? आणि कोणत्या पद्धतीनं करावा? या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का?  आपल्यापैकी अनेकांना याचं उत्तर माहिती नसेल. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अभ्यास करण्याच्या काही उत्तम सवयी आणि फायदे सांगणार आहोत. 

या पद्धतीने करा अभ्यासाला सुरुवात - 

अभ्यासाची जागा वारंवार बदलू नका 

अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची जागा. तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांनी घरात अभ्यासाची जागा ठरवून घ्यावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तमच किंवा घरातील एक विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होतं. तसंच अभ्यासाला बसताना गादीवर लोळून अभ्यास करू नये. टेबल खुर्चीवर बसून अभ्यास केल्यास प्रश्नांची उत्तरं अधिक काळ स्मरणात राहतील.  

शरीर आणि मन स्थिर ठेवा 

अभ्यासला बसताना तुमची सर्व कामे आटोपून अभ्यासाला बसा. अभ्यास करताना शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजवणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. तसंच तुमचं मन आणि बुद्धी अभ्यासावर केंद्रित करा. अभ्यासाच्या वेळी कोणताही इतर विचार करू नका. शरीर आणि मन स्थिर असल्यास तुम्हाला अभ्यासात गोडी निर्माण होईल. तसंच तुमची स्मरणशक्तीही उत्तम राहण्यास मदत होईल. 

एका विषयाला किमान एक तास 

आपण वाचलेली कुठलीही उत्तरं आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी सुरुवातीची १० मिनिटे महत्वाची आहेत. आपले मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायला किमान दहा मिनिटे लागतात. त्यानंतर आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या विषयाशी संबंधित सर्व गोष्टी आपल्याला आठवू लागतात. त्यानंतर आपण त्या विषयाशी समरस होऊन तो आत्मसात करू शकतो. तुमचा मेंदू जोपर्यंत त्या विषयावर प्रभुत्व मिळवत नाही तोपर्यंत तुमच्या स्मरणात तो विषय राहत नाही. त्यामुळे एका विषयाला किमान एक तास द्या. 

अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका 

अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. यामुळे तुमच्या घरचे अभ्यासात कुठलाही अडथळा येऊ देणार नाहीत. अडथळ्यांमुळे तुमच्या मनाची एकाग्रता भंगते आणि त्यामुळे पुन्हा मन एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळे अडथळे येऊ देऊ नका. 

तुमच्या आहाराकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या 

अभ्यासाच्या दिवसांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना दीर्घकाळ एकाच जागी बसून अभ्यास करण्याची सवय असते. म्हणूनच आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. अभ्यास सुरू करण्याच्या आधी अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येण्याची शक्यता असते. तसेच शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात.

अशी असावी अभ्यासाची खोली

अभ्यास करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची खोली आणि तुमच्या अभ्यासाच्या वस्तू. अभ्यास करताना तुमची पुस्तके, वही, पेन, पेन्सिल या सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवा. त्यांना एका जागेवर नीट ठेवा. तसेच जर तुमची पुस्तके फाटली असतील तर त्यांना शिवून घ्या. या नीटनेटकेपणामुळे तुम्हाला अभ्यास गोडी निर्माण होईल आणि तुम्ही दीर्घकाळ अभ्यास करू शकाल. 

तर या पद्धतीने अभ्यास करा आणि परीक्षेत उत्तमोत्तम गुण मिळवा. या सिरीजमधील पुढच्या सर्व बातम्या नक्की वाचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पनवेल विधानसभा मतमोजणी, प्रशांत ठाकूर आघाडीवर

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT