12 Principles and key to leadership development  Sakal
एज्युकेशन जॉब्स

नेतृत्वविकासाची गुरुकिल्ली

सकाळ वृत्तसेवा

‘नेतृत्वकलेची १२ सूत्रे’ या डॉ. केशवानंद दास लिखित पुस्तकाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. या पुस्तकाचे नाव वाचून आपल्यापैकी बहुतांश जणांना हे पुस्तक म्हणजे एखादा नेता घडवण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक असावे, असा समज होण्याची शक्यता आहे.

कारण नेतृत्व म्हणजे केवळ एखाद्या संघटनेचे किंवा एखाद्या संस्थेचे नेतृत्व अशीच बहुतेक जणांची धारणा असते. मात्र, या पुस्तकात नेतृत्वाची व्याख्या फार सूक्ष्म आणि तितक्याच व्यापक स्वरूपातदेखील करण्यात आली आहे.

आपल्या मनातील चांगल्या-वाईट भावभावना आणि स्वैरपणे धावणारे विचार यांच्यावर विवेकाने नियंत्रण ठेवणे म्हणजे स्वतःचे नेतृत्व करणे. हे स्वतःचे नेतृत्व कसे करता येईल? याबद्दल या पुस्तकात काही प्रभावी सूत्रे देण्यात आली आहेत.

त्यामुळेच नेतृत्व कौशल्याची सूत्रे सांगत असताना बाह्य परिस्थितीमध्ये बदल करण्याआधी स्वतःमध्ये कोणता बदल करता येईल? यावर लेखकाने विशेष भर दिला आहे. त्यात प्रामुख्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचे प्रयत्न, अयोग्य सवयी घालवून चांगल्या सवयी अंगी बाळगण्यासाठी स्वभावात करावे लागणारे बदल याबद्दल लेखकाने अगदी सोपी आणि दैनंदिन जीवनात उपयोगी आणता येऊ शकणारी सूत्रे सांगितलेली आहेत.

हे सर्व प्रयत्न करत असताना कोणत्याही खर्चिक गोष्ट किंवा अतिरिक्त साधनांची मुळीच आवश्यकता नसून केवळ आपल्या जीवनशैलीमध्ये आणि विचार प्रक्रियेमध्ये बदल केल्यास आपले व्यक्तिमत्त्व अधिक उजळून निघेल याची शाश्वती लेखकाने दिली आहे.

आजकाल बारीक-सारीक गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या व्यक्तींसाठी या पुस्तकातील ‘नकारात्मक मानसिकतेकडून सकारात्मक प्रवृत्तीकडे’ आणि ‘न्यूनगंडाने ग्रासणे’ ही दोन प्रकरणे अगदी उपयुक्त ठरणारी आहेत.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच यामध्ये क्लिष्ट असे विश्लेषण देण्याऐवजी सकारात्मक मानसिकता विकसित करण्यासाठी, प्रतिकूल प्रसंगातही कायम स्मरणात राहतील अशी सूत्रे सांगण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे काही छोटे उपक्रम देऊन त्या माध्यमातून आपल्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी कोणत्या कृती करता येतील आणि विचारप्रक्रिया कशी ठेवायला हवी? याबद्दल सांगण्यात आले आहे.

‘मी इतकी किंवा इतका चांगला वागूनसुद्धा या जगात माझ्या बाबतीतच वाईट का घडते? किंवा मलाच विचित्र माणसे का भेटतात?’ असे आपल्याला नेहमी वाटत असते. बऱ्याचदा आपण चांगुलपणा आणि बेसावधपणा किंवा वेंधळेपणा यात गल्लत करतो.

त्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी काय करायला हवे याबद्दलही लेखकाने विस्तृत चर्चा केली असून, ती खरे तर प्रत्येकानेच वाचायला हवी. आपल्याकडून नेहमीच दुर्लक्षित होणारे दोन प्रमुख मुद्दे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन आणि आरोग्याची काळजी.

याबाबतही काही प्रभावी सूत्रे लेखकाने आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहेत. स्वतःमध्ये नेतृत्वकौशल्य विकसित व्हावे आणि यशस्वी जीवन जगण्याची गुरुकिल्ली मिळावी यासाठी हे पुस्तक तुमची नक्कीच मदत करेल.

(संकलन - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT