12 school buildings became dangerous solapur  sakal
एज्युकेशन जॉब्स

Solapur News : स्मार्ट सिटीत विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष; १२ शाळांच्या इमारती बनल्या अतिधोकादायक

शौचालय नाही, बसायला जागा नाही आदी समस्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शाळांच्या छतांना लागलेली गळती, भिंतींना गेलेले तडे, मैदानांचा अभाव, उचकटलेल्या फरशा, कंपाउंड नसल्याने मोकाट जनावरांचा वावर, तळीरामांचा अड्डा, विद्यार्थ्यांना बसण्यास अपुरी जागा आदी समस्यांच्या विळख्यात महापालिकेच्या ३४ इमारतीत अडकल्या आहेत.

तर स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या अतिशय वाईट अवस्था असलेल्या १२ शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. स्मार्ट सिटी समावेश असलेल्या सोलापूर महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. पण या शाळांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. शहरात महापालिकेच्या एकूण मराठी, उर्दू आणि इंग्लिश अशा ५८ शाळा ३४ इमारतीमध्ये भरतात.

या शाळांचा दर्जा खालावत गेल्यानंतर पटसंख्या कमी होऊ लागली आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या पुढाकाराने हजेरी भत्तासारखे विविध उपक्रम राबवून शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.

मात्र शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियान, महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या निधीतून पायाभूत सुविधा देण्यात महापालिका कमी पडत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने हे विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत दाखल झालेले असतात.

महापालिकेच्या शाळांचा परिसर म्हणजे दुर्गंधीयुक्त, बकाल अवस्था असे एकूण चित्र आहे. शाळेत बसायला जागा नाही, भिंतीला गेलेले तडे अशा वातावरणात मुलांना शिक्षणाची गोडी लागणार कशी? असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.

कोरोनानंतर महापालिकेतील शाळांची पटसंख्या वाढू लागली, ही समाधानकारक बाब असली तरी महापालिकेच्या शाळेत मिळणारे शिक्षण आणि सुविधा ह्या स्मार्ट सिटीला लाजवेल, अशाच आहेत. २० व्या शतकातही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो, हे सोलापूरकरांचे दुदैवच म्हणावे लागेल.

शिक्षण विभागाची इमारतही गळकी

नवी पेठ परिसरात असलेल्या महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाला पावसामुळे गळती लागली होती. गेल्या दोन दिवसातील पावसामुळे संपूर्ण कार्यालय पाण्यात गेल्याचे चित्र होते.

या विभागातील कर्मचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. शिक्षण विभागातील कर्मचारीच जर सुरक्षित नसतील तर विद्यार्थी कसे सुरक्षित राहणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव माझ्याकडे आहेत. तत्काळ दुरुस्ती असलेली कामे हाती घेण्यात येणार आहेत. बहुतांश शाळांची परिस्थित बिकट आहे. सीएसआर व इतर फंडातून शाळांच्या इमारती चांगल्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- विद्या पोळ, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT