Medical Officer Google
एज्युकेशन जॉब्स

'सीआरपीएफ'मध्ये 2439 पॅरामेडिकल स्टाफची होणार भरती !

"सीआरपीएफ'मध्ये 2439 पॅरामेडिकल स्टाफची होणार भरती !

श्रीनिवास दुध्याल

केंद्रीय राखीव पोलिस दलाने देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये कराराच्या आधारावर पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (Central Reserve Police Force) (CRPF) सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाने देशभरातील विविध सीएपीएफ (CAPF) रुग्णालयांमध्ये कराराच्या आधारावर पॅरामेडिकल स्टाफच्या (Paramedical staff) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सीआरपीएफने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, पॅरामेडिकल स्टाफच्या एकूण 2439 रिक्त पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. सीएपीएफ आणि सशस्त्र दलाचे सेवानिवृत्त पुरुष आणि महिला कर्मचारी या वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात; मात्र त्यांनी सीआरपीएफने निर्धारित केलेल्या पात्रतेचे निकष पूर्ण केलेले असावे.

पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी सीआरपीएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचारी जे 62 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत त्यांना सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्यूटीकरिता एक वर्षासाठी तैनात केले जाईल. पात्रता निकषांविषयी अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.

https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_219_1_878082021.pdf या लिंकवर पाहा भरती अधिसूचना

असा करा अर्ज

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी नियोजित तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रे त्यांच्या फोटो कॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र आदी) सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना त्यांच्या सर्व तपशिलासह अर्ज साध्या कागदावर घेऊन जावे लागेल. अर्ज केलेल्या पदाचे नाव अर्जात भरावे लागेल आणि अलीकडील तीन पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सोबत घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT