indian air force  Solapur
एज्युकेशन जॉब्स

भारतीय वायू सेनेत 317 पदांची भरती! अर्जासाठी उद्या शेवटची संधी

भारतीय वायू सेनेत 317 पदांची भरती! अर्जासाठी उद्या शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा

भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टसाठी (AFCAT) अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.

भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टसाठी (Airforce Common Admission Test - AFCAT) अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे. ज्या उमेदवारांना एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यांनी अद्याप तसे केलेले नाही, ते IAF AFCAT च्या afcat.cdac.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. IAF च्या या भरती (Recruitment) मोहिमेतून एकूण 317 पदांची भरती केली जाणार आहे. AFCAT अभ्यासक्रम जानेवारी 2023 मध्ये संपेल. पुढील अर्ज पात्रता आणि निवड प्रक्रिया पाहा. (317 posts are being recruited in Indian Air Force and last chance to apply)

रिक्त जागांचा तपशील

  • SSC : 77 पदे

  • AE : 129 पदे

  • प्रशासन : 51 पदे

  • कायदा : 21 पदे

  • LG : 39 पोस्ट

जाणून घ्या पात्रता

  • फ्लाइंग ब्रॅंच : उमेदवारांनी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह एकूण 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. नोंदणीकृत संस्थेतून 60 टक्के गुणांसह बी.टेक पदवी असणे आवश्‍यक आहे.

  • ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) शाखा : उमेदवारांनी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह एकूण 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. नोंदणीकृत संस्थेतून 60 टक्के गुणांसह बी.टेक पदवी असणे आवश्‍यक आहे.

  • ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्‍निकल) (प्रशासन शाखा) : नोंदणीकृत संस्थेकडून 50 टक्के गुणांसह पीजी पदवी.

  • लॉजिस्टिक्‍स : नोंदणीकृत संस्थेतून 60 टक्के गुणांसह यूजी पदवी.

वयोमर्यादा : फ्लाइंग ब्रॅंचसाठी 20 ते 24 वर्षे. ग्राउंड शाखेसाठी 20 ते 26 वर्षे.

अर्ज फी : 250 रुपये. एनसीसी स्पेशल एंट्री असलेल्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

IAF AFCAT अभ्यासक्रमाची विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन चाचणी होईल. एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथे जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात सर्व अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT