Aided Schools sakal
एज्युकेशन जॉब्स

Aided Schools : राज्यातील अनुदानित शाळांना ४९ कोटींचे वेतनेतर अनुदान मंजूर

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर खर्च भागविण्यासाठी ४९ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

सम्राट कदम

पुणे - राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर खर्च भागविण्यासाठी ४९ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे हे अनुदान वितरित करण्यासंबंधी शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार एकूण ४९ कोटी १७ लाख ७८ हजार ५०७ इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शंभर टक्के वेतनेतरमध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार १ एप्रिल २००८ रोजी देय असलेल्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्याअनुषंगाने पाच टक्के वेतनेतर अनुदान दिले जाईल, असे शासन निर्णय स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार ३० मार्च २०१३ पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्ततेसाठी अनुदान दिले आहे. शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरु शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT