job interview marriage question for girls  
एज्युकेशन जॉब्स

मुलाखतीदरम्यान महिलांना लग्नाविषयी विचारावं का? सर्वेक्षणात 83 टक्के लोक म्हणाले..

बेटरहाफ डॉड एआयने (Betterhalf.ai)नुकतेच याबाबत सर्वेक्षण केले

सकाळ डिजिटल टीम

Ask Women About Their Marriage in Job Interviews : आजच्या स्पर्धात्मक जगात तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर चांगले काम करावे लागते. स्त्री असो वा पुरूष. प्रत्येकजण आपल्या चांगल्या क्षमता दाखवत उत्तम रिझल्ट देत असतो. पण,काही मापदंड असे आहेत ज्यामुळे नोकरी निवडताना क्षमता असूनही महिला उमेदवारांना डावलले जाते. अनेक भारतीय कंपन्या आणि रिक्रुटर्स महिला उमेदवारांना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारतात. साधारणपणे महिला उमेदवारांना तुझे लग्न झाले आहे का?, लग्न करण्याचा विचार कधी आहे? असे वैयक्तिक प्रश्न विचारतात. असे प्रश्न क्वचितच पुरूष उमेदवारांना विचारले जातात.

बेटरहाफ डॉड एआयने (Betterhalf.ai)नुकतेच याबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात, नोकरी करणाऱ्या तरुणांचे मत जाणून घेतले. ऑफिसमध्ये लग्नाच्या आधारावर नव्हे तर त्यांच्या प्रतिभेच्या आधारावर कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. लग्न आणि काम कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहू शकते, असे तरुणांचे मत आहे.

सर्वेक्षणात काय आढळले?

भारतीय कंपन्या वाढ आणि नाविन्यपूर्णतेच्या बाबतीत जगातील आघाडीच्या कंपन्यांशी आता स्पर्धा करत आहेत. पण त्यांच्या मानसिकतेचा विचार केल्यास भारतातल्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांची वैवाहिक स्थिती आणि वयाच्या आधारावर भेदभाव करणे पसंत करतात, असा दावा भारतीय तरूणांनी केला आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, 83 टक्के प्रतिसादकर्त्यांचा असा विश्वास आहे की भर्ती करणारे महिला उमेदवारांना त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल प्रश्न विचारतात. असे विचारणे चुकीचे आहे.

JOB INTERVIEW

निष्कर्ष काय म्हणतात?

सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून 89 टक्के लोकांना लग्न करण्यापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे, असे वाटते. तर, दुसरीकडे, फक्त 6 टक्के लोकांनी पुरुषच कमावणारे असावेत, याविषयी सहमती दर्शवली. तर 5 टक्के लोकांनी महिला कमावत्या असू शकतात, असे म्हटले. सर्वेक्षणात असे स्पष्टपणे दिसून आले आहे की काम करणार्‍या तरूण मुलांमध्ये मोठे बदल होत आहेत. त्यांना लग्नापूर्वी आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे वाटते.

जाणकार काय साांगतात?

बेटरहाफ डॉड एआयचे सिईओ आणि सह संस्थापक पवन गुप्ता यांनी या नव्या सर्वेक्षणाविषयी सांगितले की, जगभरात महिला आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठत आहेत. पण अशा प्रकारच्या पद्धती प्रतिभावान महिलांना नोकरी शोधण्यापासून रोखू शकतात. लग्नामुळे स्त्री आणि पुरूष दोघांवरही परिणाम होतो. पण पुरूषांना अशाप्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत. पण जसजसा काळ बदलत आहे आणि पुरोगामी संघटना समोर येत आहेत, त्यामुळे महिलांना त्यांच्या वैवाहिक स्थितीच्या आधारावर प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया थांबली पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT