आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया सुरू Sakal
एज्युकेशन जॉब्स

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया सुरू

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची भरती! अर्जप्रक्रिया झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा

136 आर्मी पब्लिक स्कूलमधील रिक्त अध्यापन पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society - AWES) तर्फे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education - CBSE) शी संलग्न देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या कॅन्टोन्मेंट्‌स आणि मिलिटरी स्टेशन्समधील (Cantonments and Military Stations) आर्मीच्या स्थानिक प्राधिकरणांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 136 आर्मी पब्लिक स्कूलमधील (Army Public School) रिक्त अध्यापन पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AWES ने जारी केलेल्या सूचनेनुसार, या शाळांमध्ये 28 जानेवारी 2022 पर्यंत पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. (8700 teacher posts will be recruited in Army Public School)

8700 इतक्‍या अध्यापन पदांची भरती

उमेदवारांनी नोंद घ्यावी की TGT, PGT आणि PRT भरतीसाठी (Recruitment) रिक्त पदांची संख्या AWES ने जाहीर केलेली नाही आणि या संदर्भात सोसायटीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, या वर्षी भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठीच्या रिक्त जागा संबंधित शाळा / व्यवस्थापनांतर्गत मुलाखती / अध्यापन कौशल्य मूल्यमापनाच्या तारखेसह व्यवस्थापनाद्वारे घोषित केले जाईल. तथापि, AWES ने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सर्व 136 आर्मी पब्लिक स्कूलमध्ये सुमारे 8700 शिक्षक पदे मंजूर आहेत. यामधून विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निर्माण होतात.

निवड प्रक्रिया

आर्मी पब्लिक स्कूल (APS) पहिल्या टप्प्यात TGT, PGT आणि PRT भरती 2022 साठी उमेदवारांच्या निवडीसाठी 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (Online Screening Test - OST) आयोजित करेल. ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्टमध्ये बसण्यासाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे 10 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केली जातील. यशस्वी उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखती / शिक्षण कौशल्यासाठी बोलावले जाईल.

असा करा अर्ज

अर्ज करण्याकरिता उमेदवारांना OST साठी नोंदणी करावी लागेल, जी AWES च्या अधिकृत वेबसाइट, awesindia.com वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकद्वारे केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT