agniveer google
एज्युकेशन जॉब्स

Agnipath Recruitment : ४ वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची तरुणांना संधी

या नवीन योजनेचा उद्देश वेगाने वाढणाऱ्या लष्कर, हवाई दल आणि नौदलातील पगार आणि पेन्शनचा खर्च कमी करणे हा आहे.

नमिता धुरी

मुंबई : केंद्र सरकारने भारतीय सशस्त्र दलात भरतीसाठी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाईल आणि त्या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटले जाईल. या भरतीसाठी प्रशिक्षणही दिले जाणार असून चार वर्षानंतर काही सैनिकांना कामगिरीच्या आधारे कायम केले जाणार असून उर्वरितांना सेवानिवृत्त केले जाणार आहे.

या नवीन योजनेचा उद्देश वेगाने वाढणाऱ्या लष्कर, हवाई दल आणि नौदलातील पगार आणि पेन्शनचा खर्च कमी करणे हा आहे. यापूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार नाही, परंतु त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करावा लागेल. या योजनेतील सैनिकांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि मंत्रालयांमध्ये नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाईल.

जाणून घेऊ या या योजनेची वैशिष्ट्ये

अग्निवीरांची भरती कशी होणार ?

भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेनुसार १७ ते २१ वयोगटातील तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना २ महिने ते ६ महिने प्रशिक्षण दिले जाईल. या अग्निवीरांच्या हातात हॅण्ड हेल्ड टार्गेट सिस्टीमही देण्यात येणार असून जवानांना होलोग्राफिक्स, नाईट, फायर कंट्रोल सिस्टीमही देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

या भरतीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिला आणि पुरुष दोघांनाही सैन्यात सेवेची संधी मिळणार आहे. १७.५ वर्षे ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना या भरतीचा भाग होण्यासाठी पात्र मानले जाईल. भारतीय सैन्यात भरतीसाठी सध्या निश्चित केलेल्या शारीरिक आणि वैद्यकीय मानकांच्या आधारे अग्निवीरची भरती केली जाईल. लष्कराच्या अटी आणि शर्तींनुसार दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले तरुण या योजनेचा भाग होऊ शकतात.

४ वर्षे संपल्यानंतर काय होणार ?

अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून ४ वर्षे सैन्यात सेवा करावी लागेल. ४ वर्षांनंतर अग्निवीरांना लष्कराची सेवा सोडावी लागणार आहे. लष्कराच्या आवश्यकतेनुसार, २५ टक्के सैनिकांना नियमित केडरचा भाग बनवले जाईल आणि उर्वरित सैनिक निवृत्त केले जातील. अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निधी पॅकेज आणि सैन्यात ४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सुमारे ११.७ लाख रुपयांचे एकरकमी व्याज दिले जाईल.

पगार किती असेल ?

या योजनेअंतर्गत अग्निवीरांना वार्षिक ४.७६ लाख रुपये पगार दिला जाणार आहे. या सैनिकांना हार्डशिप पॅकेज आणि रिस्क पॅकेज स्वतंत्रपणे दिले जाईल. त्यामुळे चौथ्या वर्षी पगार ६.९२ लाख रुपये होणार आहे. चार वर्षांच्या समाप्तीनंतर, सुमारे ११.७ लाख रुपयांचे एकरकमी व्याज दिले जाईल.

अपघाताला बळी पडल्यावर काय होईल ?

४ वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास शहीदाच्या संपूर्ण कुटुंबाला विमा दिला जाईल. यासोबतच या सेवेदरम्यान एखादा सैनिक अपंग झाल्यास त्याला ४४ लाखांपर्यंतची रक्कम दिली जाईल आणि उर्वरित नोकरीचे वेतनही दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT