Aid to tribal girl students in education After video viral Odisha government stepped in Sakal
एज्युकेशन जॉब्स

Education News : आदिवासी विद्यार्थिनीला शिक्षणासाठी साहाय्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशा सरकार सरसावले

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओडिशा सरकारने तिला शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ केला

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्वर : ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात आलेल्या बोंडा आदिवासी जमातीतील वीसवर्षीय विद्यार्थिनी रोजंदारीवर कामगार म्हणून काम करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओडिशा सरकारने तिला शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ केला आहे.

कर्मा मुदुली असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या भुवनेश्वरमधील रामा देवी महिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे. कर्मा ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील खैरपूत तालुक्यातील पडेगुडा गावाची रहिवासी आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब पालकांच्या चार अपत्यांपैकी एक आहे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूवी व्हायरल झाला होता.

गोविंदपल्लीतील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेत तिने ८२.६६ टक्के गुण मिळवीत वाणिज्य शाखेत मलकानगिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. कर्मा आपल्या शिक्षणासाठीच्या लढ्याबद्दल बोलताना म्हणाली, की मला सेवाभावी संस्थेकडून थोडेफार पैसे मिळतात.

मात्र, वसतिगृह व विद्यापीठाचे शुल्क तसेच अभ्यास साहित्य आदींचा महिना तीन हजारांचा खर्च भागविण्यासाठी ते अपुरे आहेत. त्यामुळे, उन्हाळ्याच्या सुटीत काही काम करून पैसे मिळविण्याचा मी प्रयत्न करते. मलकानगिरी जिल्हा कल्याण अधिकारी प्रफुल्लकुमार भुजबळ म्हणाले, की कर्माला शैक्षणिक खर्चासाठी सुमारे ३० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

त्याचप्रमाणे, तिला लवकरच लॅपटॉपही देण्यात येईल. तिला वार्षिक १३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. यात वसतिगृहाच्या दहा हजार शुल्कासह तीन हजारांच्या शालेय शुल्काचाही समावेश आहे. कर्माच्या पालकांनाही बोंडा विकास संस्थेकडून उदरनिर्वाहासाठी मदत केली जात आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यात येईल, असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे, मी आता पूर्णपणे माझ्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करू शकेन.

- कर्मा, आदिवासी विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT