Ambejogai Village Boy Scores 611 in NEET Without Private Coachingg Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET Success Story :ना कोचिंग,ना सणवार, मोबाईलवर अभ्यास करून पास केली NEET परीक्षा; ऊसतोड कामगारांच्या मुलाने पूर्ण केले डॉक्टर होण्याचे स्वप्न

Marathwada NEET Success Story : NEET चा निकाल लागला अन आई, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

Saisimran Ghashi

Marathwada : वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय ठेवलेल्या साकुड तांड्यावरील (ता.अंबाजोगाई) श्रीमंत गोविंद राठोड याने शिकवणी न लावता नीटमध्ये ६११ गुण घेतले. त्याची ही ध्येयपुर्ती वैद्यकीय प्रवेशाने होणार आहे. त्याच्या यशाबद्दल उसतोडीला जाणाऱ्या त्याच्या आई, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

श्रीमंतचे आई, वडील व भाऊ दिवाळीतच उसतोडीला जातात. त्यामुळे श्रीमंतने दहावीपासून एकही दिवाळी साजरी केली नाही. त्याचे पाचवीपर्यंतचे शालेय शिक्षण एका आश्रम शाळेत झाले. घरात कोणीही त्याला मार्गदर्शक नव्हता. शिक्षक व स्वंय-अध्ययनातून तो शिकत राहिला. माध्यमिक शिक्षण गावातील सरस्वती विद्यालयात झाले. आई, वडील उसतोडीला गेल्यानंतर आजी, आजोबांनी त्याचा सांभाळ करायचा.

गावाकडे दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असताना, श्रीमंतही सुट्टीच्या दिवशी मजुरीचे काम करत असे. दहावीनंतर श्रीमंतने टोकवाडी (ता. परळी) येथील रत्नेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र अंबाजोगाईतील एका अभ्यासिकेत दिवसभर थांबून त्याने अभ्यास करायचा. गावाकडून रिक्षामध्ये दररोज ये, जा करून त्याने हे शिक्षण सुरू ठेवले.

श्रीमंतला एक भाऊ व एक बहीण आहे. बहिण विवाहित असून लहान भाऊ शिक्षणापासून वंचित राहिल्याने तो आई, वडीलांना उसतोडीसाठी मदत करतो. घरची वडिलोपार्जित कोरडवाहू अडीच एकर जमीन आहे. त्यात एकच पिक येते. मजुरीवर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीमुळे त्याला शिकवणी लावता आली नाही. फक्त जिद्द आणि चिकाटीवर त्याने हे यश प्राप्त केले.

प्रतिकूल परिस्थिती

आई, वडील वर्षातील पाच महिने ऊसतोडीसाठी घराबाहेर पडलेले असायचे. त्यांच्या पश्चात आजी व आजोबांनी शिक्षणाला पाठबळ दिले. शिक्षणात मी धरसोडपणा केला असता, तर माझ्यावरही ऊसतोडीची वेळ आली असती. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवल्याने मी शिक्षण घेऊ शकलो असा विश्वास श्रीमंतने व्यक्त केला.

असा केला अभ्यास

श्रीमंत दररोज सकाळी आठ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० तास थांबून अभ्यास करायचा. घरी आल्यानंतर रात्री ८ ते १२ असे चार तास अभ्यास करायचा. २४ तासातील १४ तास तो अभ्यासात असायचा. अभ्यासिकेत त्याला कुठली शिकवणी नव्हती, मोबाईलवर ॲप वापरून त्यावर त्याने नीटच्या परीक्षेची तयारी चालु ठेवली. पहिल्या प्रयत्नात त्याला ३८३ गुण मिळाले. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने नीटमध्ये ६११ गुण घेत यश प्राप्त केले. श्रीमंत राठोडसह यशस्वी ठरलेल्या वैभव गायके व करण नायबळ यांचाही सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT