Boss Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर अपडेट : बॉसला समजून घ्या

‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींपैकी महत्त्वाच्या अशा ‘बॉसला समजून घ्या’ या विषयाचा आपण विचार करणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

- अंकित भार्गव

‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींपैकी महत्त्वाच्या अशा ‘बॉसला समजून घ्या’ या विषयाचा आपण विचार करणार आहोत.

बॉसची ‘वर्क पॅशन’ समजून घ्या. प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या ध्येयाने झपाटलेला असतो. व्यवस्थापनातील वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्यांसाठी तर हे तत्त्व अधिकच लागू आहे कारण त्याशिवाय ते त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपल्या बॉसच्या अंत:करणातील प्रेरणा समजून घेणे म्हणजे तो वरिष्ठ पदापर्यंत कशा प्रकारे पोहोचला आहे हे समजून घेण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय.

काही संस्था कामाने झपाटलेल्या लोकांना प्राधान्य देतात, तर काहींसाठी केवळ विक्रीच महत्त्वाची असते. काही संस्थांमध्ये दैनंदिन कामकाजाला सर्वोच्च महत्त्व असते तर काही ठिकाणी ठराविक प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य असते. तर काही संस्था नावीन्यपूर्ण संशोधनाला वाव देतात.

उपयोगी पडणारा माणूस बना

केवळ ‘होयबा’ होऊ नका. एखादा अडचणीचा प्रसंग आल्यास बॉसला ज्याला पहिला कॉल करावा असे वाटेल अशा प्रकारचा माणूस व्हा. व्यावसायिक आघाडीवर आपल्या बॉसने आपल्यावर अवलंबून असावे असे वाटत असल्यास तुम्ही बॉसची इतर कमी महत्त्वाची कामे प्रसंगी आपली पठडी बाजूला सारून पूर्ण करणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये तुम्ही जितकी कामे हातावेगळी कराल तितका वैविध्यपूर्ण अनुभव मिळेल. आजचा ‘गो टू’ (उपयोगी पडणारा) माणूस हाच उद्याचा बॉस असतो.

परिश्रमी आणि चलाख व्हा

काबाडकष्ट केल्यामुळे तुम्ही थकून जाल आणि काम करताना अनावश्यक स्मार्टपणा दाखवल्यास कष्ट करण्याची क्षमता संपून जाईल. त्यामुळे परिश्रम आणि चलाखपणा यांचा योग्य समन्वय साधा. साचेबद्ध विचार न करता परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेऊ शकता, हे तुमच्या बॉसला माहीत असले पाहिजे.

बॉस आणि मार्गदर्शक

तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासामध्ये रस घेणारा खऱ्या अर्थाने उत्तम मार्गदर्शक असतो. प्रत्येक बॉसमध्ये मार्गदर्शक बनण्याची क्षमता असते. तुमच्या आणि बॉसच्या नात्यामध्ये हे परिवर्तन हवे असल्यास कामाच्या पलीकडे जाऊन भावनिक बंध निर्माण होणे आवश्यक असते. यासाठी चांगला मार्ग म्हणजे दोघांमधील समान आवडीनिवडी शोधणं आणि त्यांच्यावर निवांतपणे गप्पा मारणं.

दक्षता घ्या

वरीलपैकी कोणताही मुद्दा हा वरवरचा किंवा उथळ नाही. ते तुमचे करिअर पक्क्या पायावर उभारले जाण्यासाठी केलेल्या कठोर आणि सखोल अभ्यासातून पुढे आले आहेत. हे सर्व मुद्दे आणि बॉसला खूष करण्याची ‘होयबा’ किंवा ‘खुशमस्करी’ वृत्ती यांमध्ये गल्लत करता कामा नये. तुमचा बॉस अनुभवी असल्यास त्याला हे लगेच समजेल. खरेपणाने वागा म्हणजे तुमचा बॉस हा तुमच्या आयुष्यातील एका अमूल्य ठेवा होईल.

अधिक कमावण्यासाठी अधिक शिका

बॉसचे उपयोगी पडणारे व्यक्ती बनलात की तुमच्याकडे अधिक जोखमीची कामे येणे हे ओघानेच आले. ती पार पाडण्यासाठी तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे. काही लोक कॅफेटेरियामध्ये बसून गप्पाटप्पा करत असतात किंवा काही सहा वाजता कार्यालयातून बाहेर पडतात.

ही दृश्ये पाहून तुम्हाला असे वाटू शकते मी इथे एवढे कष्ट का बरं करत आहे? तुमचा हा वेळ तुम्ही संस्थेला देत नसता, तर स्वत:करिता देत असता. या माध्यमातून तुम्ही केवळ चालू किंवा पुढचे वर्षच नव्हे तर आपल्या दीर्घकालीन भविष्यासाठी उत्पन्न मिळवत असता. कामे समोर आल्यावर ती करण्यासाठी ज्याचा हात सर्वांत आधी वर जातो अशा प्रकारची व्यक्ती बना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT