dr babasaheb ambedkar Swadhar Yojana sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune News : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले स्वाधार अर्ज ‘https://swadhar.acswpune.com’ या संकेतस्थळावर भरून आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत इयत्ता अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांना, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०१६-१७ पासून ही योजना लागू केली आहे.

पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या हद्दीत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून मुदतीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या कार्यालयात सादर करावेत.

अर्जाचा नमुना तसेच अर्ज सादर करावयाची नियमावली स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल. महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT