माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Mazgaon Recruitment 2021 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने Mazgaon Dock Shipbuilders Limited (MDSL) ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरच्या आठ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (Training Instructor Posts) पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी दहावी, बारावी, बीए, बीबीए, आयटीआय, एमबीए / पीजीडीएम पास उमेदवार अर्ज करू शकतात. (Application started for the post of training instructor Mazagon dock-check-here-how-apply)
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि आयसीटीएसएम / फिटर, स्ट्रक्चरल फिटर आणि रिगर / पाइप फिटर / वेल्डर (जी अँड ई) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ऍप्रेंटिसशिप सर्टिफिकेट परीक्षा पास असणे आवश्यक आहे. दहावीपर्यंत तसेच, उद्योगात किंवा शिक्षणामध्ये किंवा प्रशिक्षणात 5 वर्षांचा अनुभव असावा. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमासह इंडस्ट्री, टीचिंग किंवा प्रशिक्षणमध्ये 3 वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी उमेदवार एमडीएलची अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.
ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर पदासाठी असा करा अर्ज
स्टेप 1 : सर्वप्रथम उमेदवारांनी एमडीएलच्या अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in वर लॉग इन करावे.
स्टेप 2 : ऑनलाइन रिक्रूटमेंट - ऍप्रेंटिसवर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर आवश्यक माहिती नोंदवा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
स्टेप 4 : नंतर ई-मेलला पाठविलेल्या व्हॅलिडेशन लिंकवर क्लिक करा.
स्टेप 5 : वापरकर्ता नाव आणि पासवर्डसह MDL ऑनलाइन पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 6 : ऍप्रेंटिस टॅब अंतर्गत नोकरी निवडा आणि पात्रता निकष पाहा.
स्टेप 7 : अर्ज करताना, उमेदवाराकडे पासपोर्ट फोटो, त्याची स्वाक्षरी आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत असणे आवश्यक आहे.
स्टेप 8 : सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्ज भरा.
स्टेप 9 : आपली माहिती पूर्णपणे तपासा आणि नंतर अर्ज फी सबमिट करा.
स्टेप 10 : "मेन पेज' टॅबवर क्लिक करा आणि आपला अर्ज सबमिट झाल्याची खात्री करून घ्या.
फिटर, स्ट्रक्चरल फिटर आणि रीगरची 2 पदे आहेत तर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि आयसीटीएसएम, पाइप फिटर, वेल्डर (जी अँड ई), एम्प्लॉयबिल्टी स्किल्स अँड सॉफ्ट स्किल आणि साइन लैंग्वेज इंटरप्रेटर असे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.