सोलापूर : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्यापासून (बुधवार) पोलिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी गृह विभागाने पोलिस भरतीसाठी police recruitment2022.mahait.org हे संकेतस्थळ तयार केले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते २८ आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३३ पर्यंत असणार आहे.
सोलापूर शहर-जिल्ह्यात पोलिस शिपाई ९८ आणि चालक पोलिस शिपाई ७३, अशा एकूण १७१ जागांची भरती होणार आहे. कोरोना काळात पोलिस भरती होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वतंत्र निर्णय घेत १ जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२२ या काळात वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ५० गुणांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यात १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. किमान ४० टक्के गुण घेतलेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाणार आहे. मागील सात वर्षांत शासकीय नोकर भरती न झाल्याने पोलिस भरतीसाठी दहा ते पंधरा लाख अर्ज येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने स्वतंत्र संकेतस्थळ बनवले आहे. त्यावर आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
भरतीसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे...
सोलापूर जिल्ह्यातील जागा : १७१
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग (१८ ते २८) आणि मागास प्रवर्ग (१८ ते ३३)
लेखीसाठी पात्र : मैदानीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक
उंची : १६५ सें.मी.
अर्जासाठी शुल्क : खुला प्रवर्ग- ४५० रुपये व मागास प्रवर्ग- ३५० रुपये
मेरिट यादीनुसारच अंतिम निवड
मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची मेरिट यादी लावली जाईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार आहे. चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भात चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.