AAI Canva
एज्युकेशन जॉब्स

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती!

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती! जाणून घ्या तपशील

श्रीनिवास दुध्याल

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पदवीधर डिप्लोमा आणि आयटीआय अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India - AAI) ने पदवीधर डिप्लोमा आणि आयटीआय अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते AAI च्या https://www.aai.aero/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की अप्रेंटिससह अन्य पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्‍टोबर आहे.

दुसरीकडे, या पदांच्या पात्रतेच्या संदर्भात AAI ने अधिसूचनेत म्हटले आहे की, केवळ उत्तर प्रदेशातील भारतीय नागरिक, ज्यांनी 2019 मध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण केली आहे किंवा 2019 नंतर, या पदांसाठी पात्र आहेत. 30 सप्टेंबर रोजी या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असावी. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल.

AAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट, स्टेनोग्राफर, ऑफिस असिस्टंट, फायनान्स आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स ट्रेडमध्ये आयटीआय अप्रेंटिसशिप पदांची ऑफर दिली जात आहे. याव्यतिरिक्त सिव्हिल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, एरोनॉटिक्‍स, एरोस्पेस आणि आर्किटेक्‍ट शाखांमध्ये पदवी आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिप पदांसाठीही ऑफर दिली जात आहे.

AAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची तात्पुरती निवड पात्रता परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित असेल. अंतिम निवड मुलाखत / प्रमाणपत्रांची पडताळणी / प्रशस्तिपत्र आणि सामील होण्याच्या वेळी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यावर आधारित असेल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना फक्त त्यांच्या नोंदणीकृत ई- मेल आयडीद्वारे मुलाखत आणि पडताळणीसाठी बोलावले जाईल.

हा मिळेल स्टायपंड

एएआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांवर निवड झाल्यानंतर ट्रेड (आयटीआय) अप्रेंटिसशिपला 9000 चा स्टायपंड दिला जाईल. तर पदवीधर (पदवी) आणि तांत्रिक (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थींना अनुक्रमे 15000 आणि 12000 रुपये दरमहा मिळतील. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT