8000 पिन कोडसमधील 70,000 इतक्या मोठ्या संख्येतील विद्यार्थी सध्या NMIMS Global Accessद्वारे देण्यात येणा-या विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. ऑनलाईन आणि डिस्टंस एज्युकेशनमध्ये भारतामध्ये ही अग्रणी आहे आणि 13,900 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी आधीच आपली कौशल्ये अद्ययावत केली आहेत व ते सध्या कामाच्या ठिकाणी कार्यरत आहेत. ह्या 84,000 विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांमध्ये भारतातील विविधता बघायला मिळते, कारण त्यामध्ये श्रेणी 1 शहरांप्रमाणे भारताच्या ग्रामीण भागातून आलेले लोकही सहभागी आहेत.
समृद्ध वारसा, तेथील दर्जेदार अध्ययन प्रक्रिया, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगांमधील नेतृत्व करणारी फॅकल्टी, नियमित प्रकारे अद्ययावत केल्या जाणारा अभ्यासक्रम, कॉरपोरेट मान्यतेमुळे व कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळ दिल्या जाणा-या सेवांमुळे त्यांनी NMIMS ची निवड केली आहे. माजी विद्यार्थ्यांना NMIMS Global Accessचे माजी विद्यार्थी म्हणून मान्यता दिली जाते व देशभरातील गुणवत्तापूर्ण व्यक्तींच्या नेटवर्कमध्ये त्यांना सामील करून घेतले जाते.
डिस्टन्स आणि ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणारे सर्वोत्तम दर्जाचे कार्यक्रम
“आमचे कार्यक्रम (ऑनलाईन किंवा डिस्टंस) हे व्यापक प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आखण्यात आलेले आहेत: त्यांचे करीअर्स, करीअर्स बदलू इच्छिणारे व्यक्ती, करीअरमध्ये पुढे जाऊ इच्छिणारे लोक किंवा मोठ्या सुट्टीवरून परत येणारे लोक अशा आपल्या शिक्षणामध्ये प्रगती प्राप्त करू इच्छिणा-या सर्वांसाठी बनवले गेले आहेत. कार्यक्रमातील अभ्यासक्रम आणि त्याची पूर्तता हे कँपसवर होणा-या कार्यक्रमांइतकेच काटेकोर प्रकारे केले जाते व त्यामुळे बिजनेस आणि उद्योगाच्या वेगाने बदलणा-या व सर्वांत महत्त्वाच्या वास्तविक गरजांसाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्ये मिळवणे विद्यार्थ्यांना शक्य होते,” असे डॉ. शालिनी कालिया, मुख्य शैक्षणिक अधिकारी, NMIMS Global Access ह्यांनी म्हंटले. त्या पुढे म्हणाल्या, “भारत आणि जगभरामध्ये कार्यक्रमांच्या उच्च गुणवत्तेला व दर्जाला 7500 पेक्षा जास्त आघाडीच्या कॉरपोरेटसची आणि एसएमबीजची पसंती मिळाली आहे.”
अमेझॉन, एचसीएल, एचपी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, हिंदुस्तान युनिलेव्हर, बार्कलेज, एचडेफसी बँक, युबेर, टीसीएस आणि इतर आघाडीच्या कंपन्यांमधून NMIMS Global Accessचे विद्यार्थी येतात आणि ते व्यवस्थापकीय तसेच लीडरशिप पोजिशन्सवर पोहचतात. भाडेतत्त्वावर काम करणारे 300 पेक्षा जास्त भागीदार संस्थेसोबत जोडले गेलेले आहेत.
एक्झिक्युटीव्हजसाठी भविष्याची हमी देणारे शिक्षण
अनेक वर्षांपासून आपल्या व्यवस्थापन कार्यक्रमांसाठी NMIMS Global Accessला यश मिळाले आहे आणि त्यासह डेटा सायंस, एआय, एमएल, क्लाउड कंप्युटिंग व सायबर सेक्युरिटी अशा आजच्या युगातील नवीन क्षेत्रांमध्येही संस्थेने मोठी मजल मारलेली आहे व त्याद्वारे भारताच्या मनुष्यबळातील कार्यकारी कर्मचा-यांना भविष्यकाळासाठी सज्ज करणारी कौशल्ये त्यांना प्रदान केली आहेत. संस्था सध्या एक्झिक्युटीव्ह मॅनेजमेंट कार्यक्रम एमबीए (डब्ल्यूएक्स), बिजनेस मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा, अप्लाईड फायनान्समध्ये एमएससी, प्रोफेशनल डिप्लोमा, उद्योग निहाय विशेष प्रकारच्या स्पेशलायजेशन्सबरोबर डिप्लोमा आणि सर्टीफिकेट कार्यक्रमसुद्धा देत आहे. हे कार्यक्रम नियमित प्रकारे अद्ययावत केले जातात आणि शिक्षणतज्ज्ञ व उद्योगांमधील फॅकल्टीद्वारे शिकवले जातात. काही कार्यक्रमांना स्टुकेंटसोबतच्या भागीदारीसह शिकण्याच्या स्वयंपूर्ण पद्धतीसाठी सक्षम करणा-या कॅपस्टोन प्रकल्प असलेल्या हार्वर्ड बिजनेस पब्लिशिंग एज्युकेशनद्वारे मान्यतासुद्धा मिळाली आहे.
मान्यता
NMIMS Global Accessचे कार्यक्रम सर्वत्र ओळखले व मान्य केले जातात कारण एसव्हीकेएमच्या NMIMS ह्या डीम्ड होणा-या विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडीशन काउंसिलद्वारे (नॅक) ग्रेड ए प्लस देण्यात आला आहे. ही मान्यता भारतातील विद्यापीठांसाठी उच्च शिक्षणामधील सर्वाधिक मानक असल्याचे सूचक आहे. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनद्वाए (युजीसी) ह्या विद्यापीठाला स्वायत्त प्रकार 1 म्हणूनही मान्यता देण्यात आलेली आहे.
संपूर्ण भारतामधील उपस्थिती
126 पेक्षा जास्त अधिकृत प्रवेश प्रक्रिया भागीदारांसह NMIMS Global Access श्रेणी 1, श्रेणी 2 व श्रेणी 3 अशा 41 शहरांमध्ये उपस्थित आहे व त्यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगलोर, पुणे, इंदोर, अहमदाबाद, कोलकाता, हैद्राबाद आणि इतरांचा समावेश आहे.
सध्याच्या अनिश्चित मार्केटमध्ये व्यवहार्य पर्याय असण्यासाठी शिक्षण- तंत्रातील ह्या मुख्य कंपनीने विविध आर्थिक उपायांद्वारे ऑनलाईन शिक्षण अफॉर्डेबल बनवले आहे व त्यामुळे हे सुंदर शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे.
NMIMS Global Accessविषयी (एनजीए- एससीई)
NMIMS Global Access ही भारताची आघाडीची ऑनलाईन आणि डिस्टन्स संस्था आहे. स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग म्हणून 1994 मध्ये नव्याने वाढणा-या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कुशल व्यवस्थापन व्यावसायिक उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तिची सुरुवात झाली होती. 2000 च्या काळात सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये मान्यता नसलेल्या अनेक अभ्यासक्रमांचा प्रवेश झाला होता, तेव्हा स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंगने गुणवत्तापूर्ण, वाजवी दरातील व युजीसी मान्यता असलेल्या डिजिटल माध्यमांमधून देता येऊ शकणा-या उच्च शिक्षण कार्यक्रमांची गरज खूप लवकर ओळखली होती. त्यामुळे संस्थेचे नाव बदलून NMIMS Global Access (NGASCE) झाले व भारत व भारत ऑनलाईनमधील कार्यरत व्यावसायिकांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करण्याच्या मुख्य उद्दिष्टाने संस्था काम करत राहिली.
आपणसुद्धा इथून ह्या कार्यक्रमांसाठी अप्लाय करू शकता- distance.nmims.edu आणि executive.nmims.edu.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.