कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल
एज्युकेशन जॉब्स

पोलिस कॉन्स्टेबलच्या २,४५० जागा; दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

भरतीद्वारे कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २,४५० रिक्त जागा भरल्या जातील

सकाळ डिजिटल टीम

आसाम पोलिस विभागाने कॉन्स्टेबल पदांसाठी (Assam Police Constable Recruitment 2021) बंपर भरतीची अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. आसाम पोलिसांच्या नवीन कमांडो बटालियनमध्ये पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. पोलिस भरती अधिसूचना ७ डिसेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाइट slprbassam.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज १३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होतील आणि १२ जानेवारी २०२२ पर्यंत फॉर्म भरता येतील.

भरतीद्वारे कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २,४५० रिक्त जागा भरल्या (Bumper recruitment of 2400 seats) जातील. पोलिसात नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला चांगला पगार दिला जाईल. आसाम पोलिस भरती २०२१ अधिसूचना आणि महत्त्वाची माहिती थेट लिंक खाली पाहिली जाऊ शकते.

रिक्त जागा तपशील

  • आसाम पोलिस कॉन्स्टेबल रिक्त जागा

  • कॉन्स्टेबल (एबी) पुरुष आणि ट्रान्सजेंडर - २,२२०

  • कॉन्स्टेबल (एबी) महिला - १८०

  • कॉन्स्टेबल (एबी) नर्सिंग - ५०

एकूण रिक्त पदांची संख्या - २,४५०

कोण अर्ज करू शकतो?

कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून एचएसएलसी (वर्ग दहावा) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. कॉन्स्टेबल (नर्सिंग) या पदांसाठी नर्सिंग डिप्लोमाला असायला हवा. उमेदवारांची वयोमर्यादा १ जानेवारी २०२१ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २१ वर्षे असावी.

किती असेल पगार?

नवीन आसाम कमांडो बटालियनसाठी २,४५० कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती घेण्यात येईल. सर्व पात्रता आणि निकषांची पूर्तता करून नोकरी मिळविणाऱ्या उमेदवारांना ५,६०० (वेतन बँड- II) आणि १४,०००-६०,५०० ग्रेड पे आणि नियमांनुसार स्वीकारल्या जाणाऱ्या इतर भत्त्यांचा लाभ दिला जाईल.

कॉन्स्टेबल भरती २०२१ ची निवड प्रक्रिया

ज्या उमेदवारांचे अर्ज सर्व बाबतीत योग्य आढळेल त्यांना शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT