रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने असिस्टंट लोको पायलटच्या भरतीसाठी मोठी घोषणा केली आहे. मंडळाने एएलपी पदांची संख्या वाढवली आहे.पश्चिम बंगालमध्ये १७ जून 2024 रोजी झालेल्या कांचनजंगा ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
लोको पायलट्सची संख्या 5696 असिस्टंट लोको पायलट पदांची संख्या 18,799 पदांवर वाढवण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सूचना जारी केल्या आहेत की असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया 1 आठवड्यात पूर्ण करावी. लोको पायलटचा भार कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये. रेल्वे बोर्डाचे संचालक विद्याधर शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी 5696 ALP पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर 16 अतिरिक्त झोनल रेल्वेमधून असिस्टंट लोको पायलटच्या पदांवर भरती करण्याची मागणी करण्यात आली.
रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन चालवण्याची ड्युटी नऊ तासांची असते. मात्र रेल्वेकडे असिस्टंट लोको पायलटची कमतरता असल्याने चालकाला 10 ते 12 तास ट्रेन चालवावी लागते.
तसेच, यापैकी सुमारे 8 टक्के लोको पायलट आहेत जे 12 ते 16 तास ट्रेन चालवतात. यामुळे रेल्वे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने एएलपी पदांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वे भर्ती व्यवस्थापन प्रणाली, रेल्वे बोर्ड बंगलोर द्वारे आयोजित केली जाईल. एएलपी भरतीसाठी उमेदवारही बऱ्याच दिवसांपासून मागणी करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.