B. Pharmacy Admission 2024 sakal
एज्युकेशन जॉब्स

B. Pharmacy Admission 2024 : ‘बी. फार्मसी’ प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा; मुदतवाढीचे सत्र थांबले, अंतिम गुणवत्ता सोमवारी होणार जाहीर

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी मान्यताप्राप्त महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी मान्यताप्राप्त महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. नोंदणीसाठीचे मुदतवाढ सत्र थांबून अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी (ता. २३) जाहीर होणार आहे.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने १५ सप्टेंबरला सर्व राज्य शासन व प्रवेशप्रक्रिया प्राधिकरणांना परिपत्रकाद्वारे कळवले की, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ नवीन अभ्यासक्रम, प्रवेशात वाढ, नव्या महाविद्यालयांसाठी अर्ज केले आहेत.

ते विचाराधीन असून, पीसीआय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मान्यता प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार आहे, तर ३० नोव्हेंबरपर्यंत अपिलाची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. मात्र, आधीच मान्यता असलेल्या संस्थांनी अजून प्रवेशप्रक्रिया सुरू केलेली नाही.

अशा स्वरूपाची निवेदने देशभरातून प्राप्त झाली. आधीच मान्यताप्राप्त संस्थांनी अधिकृत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली. त्यामुळे मुदतवाढीचे सत्र थांबले. २० सप्टेंबरला अंतरिम गुणवत्ता यादीवर आक्षेप दाखल झाल्यावर सोमवारी (ता. २३) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.

झाला हिरमोड

तीनदा मुदतवाढ मिळालेल्या बी.फार्मसी आणि फार्म.डी.च्या अंतरिम गुणवत्ता यादी बुधवारी (ता. १८) जाहीर होणार होती. मात्र, सीईटी सेलकडून अंतरिम गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारपर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे आक्षेप व त्यानंतरची अंतिम गुणवत्ता यादीकडे प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात १०,४८९ प्रवेश क्षमता

पॉलिटेक्निकचे प्रवेश पूर्ण होऊनही फार्मसी कॉलेजचे मूल्यांकन, नव्या कॉलेजची मान्यता आणि अभ्यासक्रमवाढ, तुकडीवाढ देण्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रवेशप्रक्रिया सहा-सहा महिने रेंगाळत आहे. शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक विस्कटले आहे.

यावर्षी हे प्रवेश वेळेत होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांत १३२ डी.फार्मसी, बी.फार्मसीचे ९४, फार्म.डी.ची ७ महाविद्यालयांत १०,४८९ प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT