युनियन बँक ऑफ इंडिया (UBI)मध्ये एकूण 347 विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत.
पुणे: बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (UBI)मध्ये एकूण 347 विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. भरती जाहिरातीनुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर आहे. UBI भर्ती 2021 अधिसूचनेसाठी संपूर्ण माहिती तसेच एका क्लिकवर अर्ज करू शकता.
347 पदांसाठी मागवले अर्ज...
जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, यूबीआयने (UBI)वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम) आणि व्यवस्थापक (जोखीम) च्या 60-60 पदे, व्यवस्थापक (सिव्हिल इंजिनीअर) आणि व्यवस्थापक (आर्किटेक्ट्स) च्या 7-7 पदे, व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल इंजिनिअर). 2 पदे, व्यवस्थापक (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट) 1 पद, मॅनेजर (फॉरेक्स) च्या 50 पदांसाठी, मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) च्या 14 जागा, असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) च्या 26 जागा आणि असिस्टंट मॅनेजमेंट (फॉरेक्स) च्या 120 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 347 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
याप्रमाणे करा अर्ज...
पात्र उमेदवार UBI च्या अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in किंवा https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/ वर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर, उमेदवाराला अर्ज भरण्याच्या अधिसूचनेमध्ये प्रवेश करण्यासाठी Recruitments लिंक अंतर्गत Careers Overviews वर क्लिक करावे लागेल.
या आहेत महत्वाच्या तारखा...
- अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे.
- उमेदवार अॅप्लीकेशन डिटेल्स 3 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांची माहिती एडीट करू शकतील.
- उमेदवार 18 सप्टेंबर 2021 पर्यंत अॅप्लीकेशन फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घेऊ शकतील.
- उमेदवार 3 सप्टेंबर 2021 पर्यंत अॅप्लीकेशन ऑनलाइन सबमिट करू शकतील आणि फी भरू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.