bank-of-india Sakal
एज्युकेशन जॉब्स

बॅंक ऑफ इंडियात सपोर्ट स्टाफची भरती! आठवी पास ते पदवीधरांना संधी

बॅंक ऑफ इंडियामध्ये सपोर्ट स्टाफची भरती! आठवी पास ते पदवीधरांसाठी संधी

श्रीनिवास दुध्याल

उमेदवारांनी बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर दिलेल्या लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करणे आवश्‍यक आहे.

सोलापूर : बॅंक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) लखनौ (Lucknow) झोनने लखनौ आणि बाराबंकी (Barabanki) येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (Rural Self-Employment Training Institute - RSETI) यामध्ये सपोर्ट स्टाफच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने 21 ऑक्‍टोबर 2021 रोजी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, दोन्ही शहरांमध्ये असलेल्या आरएसईटीआयमध्ये ऑफिस असिस्टंट आणि अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर आणि इतर सपोर्ट स्टाफ या पदांसाठी कंत्राटी पद्धतीवर तसेच बाराबंकी येथे आर्थिक साक्षरता समुपदेशक (FLC) पदांची भरती होणार आहे. या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांच्या कंत्राटी नियुक्तीचा कालावधी बॅंकेच्या आवश्‍यकतेनुसार आणि नियमांनुसार आणखी वाढवता येईल.

बॅंक ऑफ इंडिया सपोर्ट स्टाफ भरतीसाठी असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर दिलेल्या लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, की अर्जाचा फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. उमेदवारांनी हा फॉर्म पूर्णपणे भरावा आणि आवश्‍यक कागदपत्रे जोडून 15 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 'झोनल मॅनेजर, बॅंक ऑफ इंडिया, लखनौ झोनल ऑफिस, स्टार हाउस, विभूती खंड, गोमती नगर, लखनौ-226010 या पत्त्यावर सबमिट करावा.

जाणून घ्या पात्रता

  • फॅकल्टी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, डिप्लोमा इन व्होकेशनल कोर्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. तसेच, एमएस ऑफिस आणि इंटरनेट संबंधित कामात प्रवीण असणे आवश्‍यक आहे. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 25 वर्षे ते 63 वर्षे.

  • ऑफिस असिस्टंट : बॅचलर डिग्री आणि कॉम्प्युटरचे ज्ञान. बेसिक अकाउंटिंगचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एमएस ऑफिस, टॅली आणि इंटरनेटच्या कामकाजात निपुण असावे. वयोमर्यादा 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षे.

  • अटेंडंट : किमान दहावी पास. स्थानिक भाषेत लिहिता-वाचता येत असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 18 वर्षे ते 63 वर्षे.

  • वॉचमन कम गार्डनर : किमान आठवी पास. शेती किंवा बागकाम किंवा फलोत्पादनाचा अनुभव. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 18 वर्षे ते 63 वर्षे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT