एज्युकेशन जॉब्स

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वोत्कृष्ट स्कॉलरशीप्स; जाणून घ्या सर्वकाही...

सकाळ डिजिटल टीम

जे विद्यार्थी हुशार असतात मात्र ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते त्यांच्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. यामध्ये आर्थिक मदतीसोबतच इतर अनेक प्रकारची मदत देऊ केली जाते. आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या टॉप 5 स्कॉलरशीप्सबाबत माहिती देणार आहोत, ज्यांमुळे प्रत्येक वर्षी लाखों मुलांना फायदा मिळतो.

NMMS - नॅशनल मीन्स कम रेरिट स्कॉलरशीप एक्झाम

ही स्कीम आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आहे. जे विद्यार्थी सध्या इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना माध्यमिक स्तरावर आपलं शिक्षण सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी स्कॉलरशीप दिली जाते. यामध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.

  • पात्रता : इयत्ता 7 वी आणि 8 वी मध्ये 55 ट्क्के गुण

  • स्कॉलरशीप - 12,000 रुपये प्रति वर्ष

  • अर्ज करण्याचा कालावधी - ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत

राष्ट्रीय छात्रवृत्ती पोर्टल म्हणजेच एनएसपीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन

https://scholarships.wbsed.gov.in/

NTSE - नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम

NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्यूकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगद्वारे याचं आयोजन केलं जातं. या स्कॉलरशीपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

  • परीक्षा दोन टप्प्यात होते - राज्य स्तरावर आणि ऑल इंडिया स्तरावर

  • पात्रता : इयत्ता 10 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी

  • स्कॉलरशीप - 1250 रुपये प्रति महिना

  • अर्जाचा कालावधी - ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत

संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या लायजन ऑफिसरच्या माध्यमातून अर्ज करु शकता

https://scholarships.wbsed.gov.in/index.php

CBSE सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशीप

ही मेरीट आधारित स्कॉलरशीप अशा विद्यार्थीनींसाठी आहे, ज्या सिंगल गर्ल चाईल्ड आहेत. जे आई-वडील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना अधिक प्रोत्साहन देणे हा या स्कॉलरशीपचा उद्देश आहे. अशा मुली ज्या CBSE माध्यमातून इयत्ता 11 वी अथवा 12 वी मध्ये शिकत आहेत. ज्यांची ट्यूशन फी शैक्षणिक वर्षाच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला 1,500 हून अधिक नाहीये, ते या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

  • पात्रता - CBSE बोर्डमधून इयत्ता 10 वीच्या परीक्षेमध्ये 60 टक्क्यांहून अधिक गुण

  • स्कॉलरशीप - दोन वर्षांपर्यंत (11 वी आणि 12 वीच्या दरम्यान) प्रति महिना 500 रुपये

  • अर्ज करण्याचा कालावधी - सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत

CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करु शकता...

https://www.cbse.gov.in/Scholarship/Webpages/Guidelines%20and%20AF.html

अल्पसंख्याकांसाठी प्री-मॅट्रीक स्कॉलरशीप

भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे आयोजित या स्कॉलरशीपचा उद्देश अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणे तसेच शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन देणे आहे. या स्कॉलरशीपसाठी विद्यार्थ्यांना गेल्या इयत्तेमधील वार्षिक परीक्षेमध्ये कमीतकमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सोबतच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये अथवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे.

  • पात्रता - अल्पसंख्याक विद्यार्थी

  • स्कॉलरशीप - ऍडमिशन फी, ट्यूशन फी, मेंटनन्स अलाउन्स

  • नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलद्वारे अर्ज करु शकता

https://scholarships.gov.in/

प्री-मॅट्रीक स्कॉलरशीप

दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून ही स्कॉलरशीप दिली जाते. याचा उद्देश इयत्ता 9 वी अथवा 10 वीमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध करुन देणे हा आहे. या स्कॉलरशीपचा फायदा केवळ त्याच विद्यार्थ्यांना मिळेल जे 40 टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग आहेत. स्कॉलरशीपसाठी आणखी एक अट आहे. त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये अथवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे. याअतंर्गत पात्र विद्यार्थ्यास मेंटनन्स अलाउन्स, डिसॅबिलीटी अलाउन्स आणि बुक ग्रांट मिळेल.

http://disabilityaffairs.gov.in/upload/uploadfiles/files/advertisement%20in%20hindi%202020-21.pdf

  • स्कॉलरशीप - मेंटनन्स अलाउन्स, डिसॅबिलीटी अलाउन्स आणि बुक ग्रांट

  • नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलद्वारे अर्ज करु शकता

http://disabilityaffairs.gov.in/contenthi/page/scholarship-hi.php

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT