मेंदू आणि हालचाली sakal
एज्युकेशन जॉब्स

मेंदू आणि हालचाली

आपले शरीरच नाही, तर मेंदूसुद्धा वृद्ध होणार नाही, असं होणं शक्य आहे का? हा प्रश्‍नच खूप आदर्शवादी आणि अवास्तव वाटतो ना? पण हो, असं होणं शक्य आहे. माझ्या बारा वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आणि न्यूरोसायन्समधील संशोधनाच्या आधारे मी एक विशिष्ट फ्रेमवर्क तयार केलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

-ग्रोइंग माइंड्स

प्रांजल गुंदेशा

आपले शरीरच नाही, तर मेंदूसुद्धा वृद्ध होणार नाही, असं होणं शक्य आहे का? हा प्रश्‍नच खूप आदर्शवादी आणि अवास्तव वाटतो ना? पण हो, असं होणं शक्य आहे. माझ्या बारा वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आणि न्यूरोसायन्समधील संशोधनाच्या आधारे मी एक विशिष्ट फ्रेमवर्क तयार केलं आहे. ज्याला ‘एक्सेलरेटेड लर्निंग फ्रेमवर्क’ असं म्हणते. त्यामध्ये ज्या ५ महत्त्वाच्या माध्यमांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांचा वापर केल्यास शिकणे अधिक आनंददायक होते आणि शिकण्याचा वेग जवळजवळ दहा पटीने वाढतो. या माध्यमांची माहिती आपण घेत आहोत. मागच्या लेखात संगीत या माध्यमाची माहिती आपण घेतली. या लेखात हालचाल, चलनवलन या दुसऱ्या माध्यमाची माहिती घेऊया.

व्यायामाचे लाभ

मानवी मेंदू हळूहळू उत्क्रांत झाला आहे हे आपणास ठाऊक आहेच. आपल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी होत असलेल्या हालचाली आणि मेंदू यांचा खोलवर संबंध आहे. कोणतीही शारीरिक क्रिया न्यूरोजेनेसिसला प्रोत्साहन देते. या प्रक्रियेद्वारे मेंदूमध्ये नवीन ‘न्यूरॉन्स’ तयार होतात. व्यायामामुळे सिनॅप्टिक प्लॅस्टिसिटीदेखील वाढते. ही न्यूरॉन्समधील संबंध अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी ही क्षमता वाढवणं महत्त्वपूर्ण मानलं जातं.

नियमित व्यायाम केल्याने दीर्घकालीन स्मृती वाढतात. त्यामुळे सतत बदलणाऱ्या मूडचे नियमन करणं आणि संज्ञानात्मक कार्य करण्याची क्षमताही वाढते. रोज व्यायाम केल्याने बीडीएनएफ नावाचे ब्रेन प्रोटीन वाढते. त्याचा मज्जातंतूवर अनुकुल परिणाम होतो. ज्यांना कोणत्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करता येत नाही (अटेंशन-डेफिसिट डिसऑर्डर) अशा व्यक्तींनी २० मिनिट सायकल नियमित चालवली, तर त्यांना स्वतःमध्ये मोठा बदल घडत असल्याचे जाणवेल. एका अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.

हालचालींचा परिणाम

हालचालींचा परिणाम मेंदूच्या विकासावर कशा पद्धतीने होतो? हे आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात फार लक्षणीयरीत्या दिसून येते. मेंदूतील पेशी गुंतागुंतीच्या असतात. त्या एकमेकांमध्ये विणल्या गेलेल्या असतात. त्यांचे जाळे व्यायामाच्या मदतीने आणखी मजबूत करता येते. यामुळे वृद्धांमधील स्मृतिभ्रंश आणि पक्षाघात यांसारखे रोगदेखील टाळता येऊ शकतात. नियमित शारीरिक हालचालींमुळे मुलांना लक्ष केंद्रित करण्यास आणि एकाग्रता वाढवण्यात मदत होते. याचा फायदा शैक्षणिक यशासाठी होतो. शारीरिक क्रियांमधील समन्वय वाढतो. समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. शरीरातील आणि विचारातली लवचिकता वाढवते. शारीरिक हालचालींमुळे डोपामाइन, सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढते. यामुळे ताण-तणाव निर्माण करणारे संप्रेरक कमी होतात.

नियमित व्यायामाव्यतिरिक्त आपण शैक्षणिकदृष्ट्याही काही महत्त्वपूर्ण हालचालींचा समावेश दैनंदिनीत करून घेऊ शकतो. त्याबाबत माहिती घेऊया -

ब्रेन ब्रेक्स : शिकण्याशी संबंधित गोष्टींमध्ये विशिष्ट कालावधीने छोटे छोटे ‘ब्रेक’ घेतल्यास विद्यार्थ्यी पुन्हा उत्साहाने शिकवण्याकडे लक्ष देतात. ब्रेन जिम आणि न्यूरोबिक्ससारख्या तंत्रांचा वापर करूनदेखील मेंदूला शिकण्यासाठी उत्तेजित करता येते.

शिक्षणातील हालचाल: धावणे किंवा एखाद्या खेळाचा शिक्षणामध्ये समावेश करा. जसे की, गणिताचे प्रॉब्लेम सोडवताना विशिष्ट हातवारे करा किंवा हालचाल आणि संगीताचा वापर करून ऐतिहासिक दृश्य, घटना उलगडून दाखवा. हालचालींवर आधारित अभ्यास सत्रे प्रौढांसाठी भरवा आणि कॉर्पोरेट प्रशिक्षणातही या सत्रांचा समावेश करा.

मुक्त खेळ : मधल्या सुट्टीच्या वेळेत किंवा संध्याकाळी मुले मुक्तपणे त्यांना आवडेल तो खेळ खेळू शकतील असे वातावरण त्यांच्यासाठी तयार करा.

नेचर वॉक : निसर्गाशी स्वतःला जोडून घेणं, फिरायला जाणं, निसर्गसौंदर्याचा आनंद घेणं यामुळे आपण समृद्ध होत जातो. निसर्ग अनेक नवीन अनुभव देतो आणि अनेक गोष्टी सूचवतही जातो. त्यामुळे मेंदू, मन शांत होतं.

एक साधा मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवा की, ‘जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं, तेव्हा आपण चांगलं करतो. ‘ई-मोशन’ ही गतीमध्ये निर्माण झालेली ऊर्जा असते.’ त्यामुळे आपल्याला चांगलं वाटेल असं काही तरी सकारात्मक कार्य सतत करत राहा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर Pranjal_gundesha आणि यू-ट्यूबवर TheIntelligencePlus या चॅनेलला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT