Candidates alleged questions from private tuition papers were included selection test of mahajyoti esakal
एज्युकेशन जॉब्स

MahaJyoti : महाज्योतीच्या परीक्षेत खासगी शिकवणीचे प्रश्न?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) एका निवड चाचणीमध्ये चक्क खासगी शिकवणीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

यासंबंधी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिला आहे. महाज्योतीच्या वतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते.

त्यासाठीची निवड चाचणी ३० जुलै रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातील सुमारे एक हजार जागांसाठी ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. एकूण १०० प्रश्न आणि २०० गुणांसाठीची ही परीक्षा होती. त्यातील बहुतेक प्रश्न पुण्यातील एका खासगी प्रशिक्षण वर्गाच्या ‘टेस्ट सिरीज’मधले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

त्याची दखल घेत या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे महेश घरबुडे सांगतात, ‘‘महाज्योतीच्या परीक्षेत विविध क्लासेसच्या पेपर मधील प्रश्न जशाच्या तसे येत असतील तर हे गंभीर आहे. असे झाले तर विशिष्ट मुलांनाच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला संधी मिळेल. इतरांवर अन्याय होईल.

कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांवर अन्याय होता कामा नये.’’ महाज्योतीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तक्रारींची दखल घेऊन तत्काळ चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश खवले यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT