एज्युकेशन जॉब्स

Career Guidance : १० वी नंतर काय? क्षेत्र कसं निवडायचं? विद्यार्थ्यांच्या शंकांचं सोल्युशन एका क्लिकवर...

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ डिजिटल टीम

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते.

दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत राहात आहे.

करिअर निवडण्याची पारंपरिक पध्दत

  • आई-वडील, नातेवाईक सांगतील ते करिअर निवडणे

  • मित्र किंवा मैत्रिणी जे निवडतील ते करिअर निवडणे

  • आवड आहे म्हणून त्या क्षेत्रात करिअर निवडणे (उदा. क्रिकेट आवडते पण करिअर होत नाही)

  • स्वतःच्या क्षमता व आवडीचा सांगड न घालता करिअर निवडणे

  • दहावीच्या टक्केवारी नुसार शाखा निवडणे

करिअर निवडण्याची शास्त्रीय पध्दत

  • कलचाचणी अहवालाचा अभ्यास करणे

  • स्वतःमधील टॅलेंट व आवडीचा अभ्यास करुन करिअर निवडणे

  • टॅलेंट समजून घेत समुपदेशकांशी चर्चा करुन करिअर निवडणे

  • करिअर निश्चिती होत नसेल तर एखादी शाखा निवडून स्वतःला करियरसाठी अवधी देणे

  • दोन ते तीन टॅलेंट स्ट्रॉंग आहेत लक्षात घेऊन करिअर निश्चिती

हे आहे टॅलेंट

१. दृष्टीची निपुणता : कल्पना करणे. हे विद्यार्थी सहजतेने चांगले ड्रॉइंग , पेंटिंग काढू शकतात नकाशा चांगल्या पद्धतीने समजू शकतात .

करिअर: आर्किटेक्ट , इंजिनिअर , इंटेरियर डिझायनर इ.

२. भाषेची निपुणता : हे विद्यार्थी लिहिताना, बोलताना शब्द चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. गोष्टी लिहिणे, माहिती लक्षात ठेवणे, वाचणे सहजतेने करतात.

करिअर : लेखक , पत्रकार , वकील , शिक्षक इ .

३. गणितीय निपुणता : हे विद्यार्थी सहजतेने व आवडीने गणिते सोडवितात.

करिअर : इकॉनॉमिस्ट , CA , ऑडिटर , इंजिनिअर , अकाउंटंट , कॉम्प्युटर प्रोग्रॅमर इ .

४. शारीरिक निपुणता : हे विद्यार्थी शारीरिक हालचाली सहजतेने करू शकतात

करिअर : ॲथलिट्स, डान्सर, ॲक्टर, बिल्डर, सोल्जर्स

५. संगीत निपुणता : हे विद्यार्थी संगीत व आवाजाबद्दल संवेदनशील असतात.

करिअर : गायक, वादक, म्युझिक टीचर इ .

६. व्यक्तिगत निपुणता : या विद्यार्थ्यांचे स्वतः सोबत चे रिलेशन चांगले असतात. स्वतःच्या भावना, विचार व्यवस्थित समजू शकतात.एकटे राहून काम करतात.

करिअर : लेखक , तत्त्वज्ञानी , सिद्धांतवादी , शास्त्रज्ञ इ .

७. सामाजिक निपुणता : हे विद्यार्थी इतरांच्या भावना समजून घेण्यात व इतरांसोबत सहजतेने मिसळतात.

करिअर: मॅनेजर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, सेल्स पर्सन, मानसोपचार तज्ञ इ .

८. नैसर्गिक निपुणता : हे विद्यार्थी निसर्गाबद्दल संवेदनशील असतात.

करिअर : जीवशास्त्रज्ञ, शेतकरी, बागकाम, वाइल्ड लाइफ अभ्यासक

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आवडी व क्षमतांची सांगड घालून पालक, शिक्षक व समुपदेशकांशी विचार विनिमय करायला हवा. आठपैकी कोणचे टॅलेंट आपल्यामध्ये चांगले आहेत हे समजून घेत चांगले निर्णय घ्यावेत, असा सल्ला करियर समुपदेशक सुयश पुकाळे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT