CBSE Board esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE Board : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाने दिली शैक्षणिक सत्रात सूट

CBSE Board : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी मध्ये मुलभूत गणित किंवा स्टॅंडर्ड मॅथेमॅटिक्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अधिसूचना जारी केली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

CBSE Board : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी मध्ये मुलभूत गणित किंवा स्टॅंडर्ड मॅथेमॅटिक्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार यावर्षी सीबीएसईच्या ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत गणित हा विषय १० वीत घेतला आहे, त्यांना इयत्ता ११ वी साठी स्टॅंडर्ड मॅथेमॅटिक्स हा विषय निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे, जर सीबीएसईच्या १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्याने मुलभूत गणिताचा (Basic maths) पर्याय निवडला असला तरी तो ११ वी मध्येही मानक गणिताचा (041) अभ्यास करू शकतो. विशेष म्हणजे मंडळाने गणिताचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची क्षमता आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यास शाळा प्रमुखांना सांगितले आहे.

नियमांनुसार, इयत्ता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथेमॅटिक्स हा विषय फक्त अशाच विद्यार्थ्यांना दिला जातो, ज्यांनी १० वीमध्ये मुलभूत गणित विषयाचा अभ्यास केला आहे. थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत गणित विषयाची निवड केली आहे, त्यांनाच केवळ ११ वीच्या इयत्तेमध्ये स्टॅंडर्ड मॅथेमॅटिक्स विषयाचा अभ्यास करण्याची परवानगी आहे.

कोवीडच्या महामारीनंतर सीबीएसईने पहिल्यांदाच या नियमात शिथिलता आणली होती. परंतु, जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, ही सूट या सत्रातही अर्थात २०२४-२५ मध्ये ही लागू होईल.

या व्यतिरिक्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील इयत्ता १० वीच्या विदयार्थ्यांनी त्यांच्या विषयाची निवड ही विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. कारण, एकदा उमेदवारांच्या यादीमध्ये (List Of Candidates) विद्यार्थ्यांचे नाव फायनल झाल्यानंतर पुन्हा त्यांना बदल करता येणार नाहीत. त्यामुळे, विषयांची निवड विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक करावी.

यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये सीबीएसईने इयत्ता ११ वी आणि १२ वीमध्ये गणितासाठी द्विस्तरीय प्रणाली लागू केली होती. त्यानुसार, इयत्ता १२ वीमध्ये मुलभूत गणित (०४१) शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानक गणित (Standard Mathematics) तयार करण्यात आले होते, तर मुलभूत गणित (Basic Maths) हे गणित शिकण्यास इच्छुक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले होते.

त्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत गणित (२४१) हा विषय इयत्ता १० वीमध्ये निवडला होता, त्यांना इयत्ता ११ वी मध्ये Applied Mathematics हा विषय शिकण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT